पीएम केअर्स निधीतून मिळणारे व्हेंटिलेटर्सपैकी अगदी ५ ते १० टक्के व्हेंटिलेटर्समध्ये काही दोष असू शकतो आणि असे खराब व्हेंटिलेटर्स असतील तर त्याविरुद्ध कारवाई नक्कीच करायला हवी, पण त्यावरून राजकारण कसले करता, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. सोमवारी औरंगाबाद येथे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले की, महाराष्ट्राला मिळालेले ५ हजार व्हेंटिलेटर्स चांगल्या परिस्थितीत आहेत. औरंगाबाद येथे केंद्र सरकारकडून मिळालेले व्हेंटिलेटर्स सरकारीऐवजी खासगी रुग्णालयांना देण्यात आल्याच्या प्रकरणावरून भाजपाने ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
हे ही वाचा:
रेमडेसिवीरचे देशातील उत्पादन १ कोटी १९ लाख मात्रा प्रतिमहिना
चक्रीवादळामुळे किनारपट्टीनजिकची कुटुंबे हलविली सुरक्षित स्थळी
ऑक्सिजन, लसींच्या साठ्याचे ठाकरे सरकारने काय केले, ते कळलेच पाहिजे
तृणमूल कार्यकर्त्यांचा सीबीआय कार्यालयावर हल्ला
१३ मे रोजी राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयाला मिळालेल्या व्हेंटिलेटर्सविरोधात प्रश्न उपस्थित केले होते. येथील घाटी रुग्णालयातील १५० पैकी केवळ १५ व्हेंटिलेटर्स योग्य परिस्थितीत आहेत, असा दावा त्यांनी केला होता. काँग्रेसचे प्रवक्त सचिन सावंत यांनीही व्हेंटिलेटर्सच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित केली होती पण त्यांचे हे सवाल निराधार असल्याचे नंतर सिद्ध झाले. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही हे व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना विकले गेल्याचे म्हटले होते. आकडेवारीसह ही बाब त्यांनी लक्षात आणून दिली होती.
त्यासंदर्भात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, औरंगाबादला देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स हे खासगी रुग्णालयांसाठी नव्हते. असे असतानाही ३ व्हेंटिलेटर्स सिग्मा आणि २० एमजीएम खासगी रुग्णालयांना देण्यात आले. तर ५५ व्हेंटिलेटर्स इतर खासगी रुग्णालयांना देण्यात आले. सरकारी रुग्णालयांना देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स खासगी रुग्णालयांना का देण्यात आले. हा घपला कशासाठी? सरकारने याचा खुलासा करावा आणि याची चौकशी व्हायला हवी. दरेकर म्हणाले की, केवळ ३ व्हेंटिलेटर तज्ज्ञांनी बसविले तर बाकी सरकारी अधिकाऱ्यांनी बसविले त्यामुळे ते खराब झाले.