26 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरदेश दुनियाअमेरिकेहून परतल्यावर न थांबता पंतप्रधान मोदींनी इथे का दिली भेट?

अमेरिकेहून परतल्यावर न थांबता पंतप्रधान मोदींनी इथे का दिली भेट?

Google News Follow

Related

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अथक मेहनत घेत असतात. अमेरिकेहून परतल्यानंतरही त्यांनी विश्रांती न घेता आपले काम सुरूच ठेवले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला भेट दिल्यानंतर रविवारी मायदेशी परतले पण त्यानंतर आराम न करता त्यांनी तातडीने नव्या संसद भवनाच्या कामाच्या ठिकाणी भेट दिली.

मोदी यांनी सेंट्रल व्हिस्टा या नव्या संसद भवनाच्या जागेची पाहणी केली. त्याची आता बरीच चर्चा सुरू आहे. भारतात परतल्यानंतर त्यांनी रात्री पावणेनऊच्या सुमारास सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला भेट दिली. तेथे जवळपास तासभर ते सगळ्या कामांची निगराणी करत होते, त्यांची पाहणी करत होते. या कामाची प्रगती कशी होते आहे त्याची माहितीही त्यांनी घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतही ६५ तासांच्या दौऱ्यादरम्यान तब्बल २० बैठका घेतल्या. विविध ठिकाणी उपस्थित राहून त्या बैठकीत चर्चा केली शिवाय विमानातून भारताकडे येत असतानाही त्यांनी विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अमेरिकेला जातानाही ते कागदपत्रे घेऊन काम करत असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. दिवसातील १७-१८ तास ते कामात व्यग्र असतात ही बाब आता सर्वांना ठाऊकच झाली आहे.

हे ही वाचा:

‘लिफ्ट करा दे’ च्या नादात अखिलेश यांची पोलखोल

एमओए : मनमर्जी ऑलिम्पिक असोसिएशन

इलेक्ट्रिक वाहनांचे आवाहन; पण खर्च पेट्रोल-डिझेलवरच

ठाण्यात अभियंत्यांना निलंबित करून प्रकरण ‘बुजवले’

 

कोरोनाच्या काळातही त्यांनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री, आयएएएस अधिकारी, डॉक्टर्स आदिंशी सातत्याने चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्यांना सूचना केल्या.

सेंट्रल व्हिस्टा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याद्वारे नवे संसद भवन उभारले जाणार आहे. त्यात अनेक अत्याधुनिक गोष्टींचा समावेश असेल. विरोधकांनी मात्र सातत्याने या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. पण देशाची गरज ओळखून मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हा प्रकल्प अधिक उत्तम पद्धतीने होईल, याची काळजी घेतली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा