27 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरराजकारणअदानीविरोध करणारी काँग्रेस तेलंगणातील करारानंतर गप्प

अदानीविरोध करणारी काँग्रेस तेलंगणातील करारानंतर गप्प

अदानीसोबत सामंजस्य करार का केले? याचे उत्तर देण्यास नकार

Google News Follow

Related

उद्योगपती अदानी यांना भाजपचा वरदहस्त मिळत असल्याचा आरोप अविरतपणे करणाऱ्या काँग्रेसने तेलंगणातील आपल्या सरकारने दावोसमध्ये अदानी व्यावसायिक समूहासोबत १२ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार का केले, याचे उत्तर देण्यास नकार दिला.

पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने काँग्रेस सातत्याने भाजपवर अदानी यांच्या मुद्द्यावरून हल्ला करते. मग तेलंगणा सरकारने दाव्होस परिषदेत याच अदानींसोबत सामंजस्य करार का केला, असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र हा प्रश्न येताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी उत्तर देण्यास असमर्थता दर्शवत त्यांच्यापुढील माइक प्रवक्त्या सुप्रिया शिनाते यांच्यासमोर ठेवला. मात्र त्यादेखील या प्रश्नाला उत्तर देऊ शकल्या नाहीत. ही पत्रकार परिषद जाहीरनामा प्रसिद्ध करण्याकरिता घेतली असून पत्रकार परिषदेतील प्रश्न या विषयापुरतेच मर्यादित असतील, असे सुप्रिया यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारने १७ जानेवारी रोजी दाव्होस येथील जागतिक अर्थविषयक फोरममध्ये अदानी ग्रुपशी सुमारे १२ हजार ४०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. अदानी ग्रुपने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, या सामंजस्य करार स्वाक्षरीदरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी आणि अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी उपस्थित होते. या सामंजस्य करारातून हरित, शाश्वत, सर्वसमावेशक आणि परिवर्तनात्मक आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दिशेने एक मोठी प्रगतीची अपेक्षा केली जात आहे.

पहिल्या सामंजस्य करारामध्ये, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) अत्याधुनिक १०० मेगावॉट क्षमतेचे डेटा सेंटर स्थापित करण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पुढील पाच ते सात वर्षांत हे केंद्र उभे राहील. या डेटा सेंटरच्या माध्यमातून शाश्वततेला प्राधान्य दिले जाईल आणि ते त्याच्या कार्यासाठी अक्षय ऊर्जा स्रोतांवर अवलंबून असेल. या उपक्रमामुळे ६०० जणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पासाठी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक पुरवठादार आधार विकसित करण्यासाठी अदानी ग्रुप स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) आणि स्टार्टअप्सशी सहकार्य करणार आहे.

हे ही वाचा:

जया शेट्टींनी कबड्डीचीच नव्हे तर अनेक खेळांची केली सेवा!

राम मंदिर उद्घाटनापूर्वी आयएसआयएस संबंधित दहशतवाद्याला उत्तर प्रदेशातून अटक!

पवारांच्या नैराश्याचे कारण जाणून घ्या…

थंडी वाजल्यामुळे पठ्ठ्याने थेट ट्रेनमध्येच शेकोटी पेटवली!

तर, दुसऱ्या सामंजस्य करारानुसार, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एजीईएल) शाश्वत ऊर्जेच्या साठवणुकीसाठी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तर, अंबुजा सीमेंटतर्फे दरवर्षी ६० लाख टन सिमेंटची निर्मिती होईल, असा सिमेंटचा निर्मिती कारखाना पुढील पाच वर्षांत उभारला जाणार आहे. ७० एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यामुळे अंबुजा सिमेंटची उत्पादनक्षमता वाढणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा