ज्या सरकारजवळ १७० चे बहुमत आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वर्षे महाराष्ट्राला आहे. सरकारच्या मनात एवढी भीती का?गुप्त मतदान पद्धतीने जी अध्यक्षपदाची निवडणूक व्हायची ती आता आपण वेगळ्या पद्धतीने करतो आहोत. सत्तापक्षाला आपल्या आमदारांवर विश्वास उरलेला नाही, की त्यांना बहुमत नाही. वरवर सगळे पाठिंबा देतात पण मनात खदखद असल्यामुळे गुप्त मतदान पद्धतीत आपला अध्यक्ष पाडतील असा विश्वास असावा, अशा शब्दांत विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षावर शरसंधान केले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आवाजी मतदानाने निवड करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
त्याबद्दल फडणवीस म्हणाले की, बदल करण्यासाठी धावपळ कशाला? नियम स्थगित करू शकतो, पण त्याच्या रचनेत बदल करता येत नाही. आपले जे रोजचे काम आहे त्यात नियम ५५ आणि ५७ हे अपवादात्मक परिस्थितीत वापरले जातात. नोटीशीचा कालावधी कमी करण्यासाठी हे नियम वापरता येईल. पण वैधानिक कामांसाठी यात कालावधी कमी करण्यासाठी नियम वापरता येणार नाही. यात केवळ स्थगिती देता येते. आपण व्याख्या बदलत आहात. याला आमची हरकत आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकार विरोधात अभाविप आक्रमक! मुंबई विद्यापीठाबाहेर आंदोलन
‘ठाकरे सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय झालेली नाही’
इम्पेरिकल डेटासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर
‘ठाकरे सरकारचा धिक्कार असो’…विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून विरोधकांचे आंदोलन
आपण रेटून नेणार असाल तर कायदेशीर लढा देऊ. ६० वर्षे तसेच नियम आहेत आहे. लोकसभेत तसेच होते. यानंतर हे नियम बदलायची गरज का आली, इतके असुरक्षित सरकार पाहिलेले नाही. या प्रस्तावाला माझी हरकत आहे.
ज्या सरकारकडे 170चे बहुमत सांगितले जाते,त्या सरकारच्या मनात अध्यक्ष निवडणुकीसाठी स्वत:च्या बहुमातावर विश्वास का नाही❓
नियम बदलविले तर किमान त्याचा सभागृहासमोरील विचाराचा कालावधी कमी करता येणार नाही.महाराष्ट्राच्या इतिहासात इतके असुरक्षित सरकार मी पाहिले नाही#MaharashtraAssembly pic.twitter.com/HhF3GHZAc1— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 22, 2021
अटलजींचा विषय आला म्हणून सांगतो. अध्यक्षाची जी निवडणूक आहे त्यात घोडेबाजार झाला असता तर त्याला व्हीप लागू झाला असता. अध्यक्ष हरला तरी सरकार पडत नाही, त्यामुळे अध्यक्षांच्या निवडणुकीला व्हीप देता येत नाही. अटलजींनी सगळे बदल केले, पण अध्यक्षांच्या निवडणुकीला व्हीप लागू केला नाही. त्यामुळे नवाबभाई तुम्ही काहीही काय सांगता. ही उपरती भीतीतून तयार झाली आहे, असे म्हणत फडणवीस यांनी नवाब मलिक यांना जाब विचारला.