34 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरराजकारण१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत

१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत

Google News Follow

Related

ज्या सरकारजवळ १७० चे बहुमत आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वर्षे महाराष्ट्राला आहे. सरकारच्या मनात एवढी भीती का?गुप्त मतदान पद्धतीने जी अध्यक्षपदाची निवडणूक व्हायची ती आता आपण वेगळ्या पद्धतीने करतो आहोत. सत्तापक्षाला आपल्या आमदारांवर विश्वास उरलेला नाही, की त्यांना बहुमत नाही. वरवर सगळे पाठिंबा देतात पण मनात खदखद असल्यामुळे गुप्त मतदान पद्धतीत आपला अध्यक्ष पाडतील असा विश्वास असावा, अशा शब्दांत विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षावर शरसंधान केले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आवाजी मतदानाने निवड करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

त्याबद्दल फडणवीस म्हणाले की, बदल करण्यासाठी धावपळ कशाला? नियम स्थगित करू शकतो, पण त्याच्या रचनेत बदल करता येत नाही. आपले जे रोजचे काम आहे त्यात नियम ५५ आणि ५७ हे अपवादात्मक परिस्थितीत वापरले जातात. नोटीशीचा कालावधी कमी करण्यासाठी हे नियम वापरता येईल. पण वैधानिक कामांसाठी यात कालावधी कमी करण्यासाठी नियम वापरता येणार नाही. यात केवळ स्थगिती देता येते. आपण व्याख्या बदलत आहात. याला आमची हरकत आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकार विरोधात अभाविप आक्रमक! मुंबई विद्यापीठाबाहेर आंदोलन

‘ठाकरे सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय झालेली नाही’

इम्पेरिकल डेटासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर

‘ठाकरे सरकारचा धिक्कार असो’…विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून विरोधकांचे आंदोलन

 

आपण रेटून नेणार असाल तर कायदेशीर लढा देऊ. ६० वर्षे तसेच नियम आहेत आहे. लोकसभेत तसेच होते. यानंतर हे नियम बदलायची गरज का आली, इतके असुरक्षित सरकार पाहिलेले नाही. या प्रस्तावाला माझी हरकत आहे.

अटलजींचा विषय आला म्हणून सांगतो. अध्यक्षाची जी निवडणूक आहे त्यात घोडेबाजार झाला असता तर त्याला व्हीप लागू झाला असता. अध्यक्ष हरला तरी सरकार पडत नाही, त्यामुळे अध्यक्षांच्या निवडणुकीला व्हीप देता येत नाही. अटलजींनी सगळे बदल केले, पण अध्यक्षांच्या निवडणुकीला व्हीप लागू केला नाही. त्यामुळे नवाबभाई तुम्ही काहीही काय सांगता. ही उपरती भीतीतून तयार झाली आहे, असे म्हणत फडणवीस यांनी नवाब मलिक यांना जाब विचारला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा