ईश्वर सेवेबद्दलचा संभ्रम का वाढवत नेताय?

ईश्वर सेवेबद्दलचा संभ्रम का वाढवत नेताय?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून महाराष्ट्र अजून सावरत नाहीये. राज्यातला लाॅकडाऊन टप्प्याटप्प्याने हटवला जात आहे. अशा परिस्थितीत आता आषाढी एकादशीच्या पंढरपूर वारीचा विषय ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत आषाढी एकादशीची पंढरपूर वारी रद्द करण्यात आली होती. आत्ताही जुलै महिन्यात वारी येऊ घातली असताना वारी संबंधीचा कोणताच ठोस निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला दिसत नाही.

या वर्षी जुलै महिन्यात 20 तारखेला आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अजून कोणताही निर्णय घेतला नसला तरीही पंढरपूरच्या आधी असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीकडून प्रतीकात्मक पालखी सोहळ्याची मागणी करण्यात आली आहे. आषाढीच्या पंढरपूर वारीत वाखरी येथे पालख्यांचा शेवटचा मुक्काम असतो. तर वारीचे एक प्रमुख आकर्षण असणाऱ्या रिंगणापैकी शेवटचे रिंगण वाखरी येथे होते. पण याच वाखरी गावच्या ग्रामपंचायतीकडून कोविडच्या संकटाचा विचार करता या वर्षीही प्रतीकात्मक पालखी सोहळा व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासंबंधीचे पत्र वाखरी ग्रामपंचायतीकडून मुख्यमंत्री आणि आळंदी देवस्थानला पाठवण्यात आले आहे. आषाढी वारी संबंधातली कोणताही ठोस निर्णय घेण्यात राज्य सरकार करत असल्याचा आरोप होत असतानाच यावरून विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी ही आक्रमक झालेली आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधानांची भेट घेण्यापूर्वी स्वतःच्या हातातील गोष्टी करायला हव्या होत्या

पुणे आग: मोदींनी जाहीर केली मदत, मुख्यमंत्री ठाकरे निद्रिस्त

सौ सोनार की, एक लोहार की

राज्यांच्या अपयशावर उतारा; सर्वांना मोफत लसीची मोदींची घोषणा

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. लाखो वारकऱ्यांचा नित्यनेम असलेल्या आषाढी वारीबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजूनही टाळताहेत. पालखी सोहळ्याबद्दल सरकारने वेळेत निर्णय घेतला, तर बिघडतं कुठे? ईश्वर सेवेबद्दलचा संभ्रम का वाढवत नेताय?’ असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे.

Exit mobile version