मुंबई पोलिसांनी पॉर्न फिल्म प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात गुन्हे दाखल केले होते आणि त्याचवेळी ९ जणांना अटकही करण्यात आली होती. मग त्यावेळी राज कुंद्राला अटक का केली गेली नाही. तो त्यावेळी समाजात उजळ माथ्याने फिरत होता.
या पॉर्न फिल्म प्रकरणातला मुख्य आरोपी राज कुंद्रा ५ महिने १५ दिवस मोकळा होता. मग त्याला अटक करण्यात विलंब का झाला, असा सवाल भाजपा नेते आमदार कदम यांनी विचारला आहे.
राम कदम यांनी सवाल उपस्थित केला आहे की, त्याच महिन्यात वसुलीबाज बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे मुंबई क्राईम ब्रांचचा प्रमुख अधिकारी होता. मग हा प्रश्न निर्माण होतो की वाझेमुळे राज कुंद्राच्या अटकेला विलंब झाला का? की कुंद्रा आणि वाझे मध्ये काही व्यवहार तर झाला नाही ना ? नेमके सत्य काय ?
हे ही वाचा:
काय लिहिले आहे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात?
नरेंद्र मोदी करणार ‘हे’ ऐतिहासिक काम
यंदा ‘या’ गणपतीचं दर्शन भाविकांना घेता येणार
लखनऊमधील मंदिरे बॉंम्बने उडवण्याची निनावी धमकी
राम कदम यांनी असेही प्रश्न विचारले आहेत की, माजी मंत्री किंवा अन्य कोणी नेता यात सहभागी होता का? कोणा मोठ्या व्यक्तीच्या आशीर्वादाशिवाय किंवा काही घेणं देणं झाल्याशिवाय हे शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. म्हणून तुम्हाला विनंती आहे की, राज कुंद्राची विलंबाने अटक आणि वाझेसोबत त्याचे संबंध होते का ? असतील तर नेमके काय ? याचीही चौकशी झाली पाहिजे, आरोपीची मदत करणारे पोलिस अधिकारी आणि कोणी राजकीय वरदहस्त असेल तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहजे ! महाराष्ट्राच्या जनते समोर यांचे खरे चेहरे येणे गरजेचे आहे.
राज कुंद्रा आणि त्याच्या सहकाऱ्याला पोलिसांनी पॉर्न फिल्मप्रकरणी अटक केली आहे.