छत्तीसगडमध्ये का सुरु झाला हिंदू-मुसलमान संघर्ष?

छत्तीसगडमध्ये का सुरु झाला हिंदू-मुसलमान संघर्ष?

छत्तीसगडच्या कबीरधाम जिल्ह्यातील कवर्धा शहरात अस्वस्थ शांतता पसरली आहे. धार्मिक हिंसाचारानंतर प्रशासनाने मंगळवारी कर्फ्यू जाहीर केला आहे. शहरात सुमारे १५०० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.

“मंगळवारी संध्याकाळनंतर कोणत्याही हिंसाचाराची नोंद झालेली नाही. शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस हिंसाचाराचे सर्व व्हिडिओ स्कॅन करत आहेत आणि हिंसा करणाऱ्यांची ओळख पटवत आहेत. त्याचबरोबर एफआयआर नोंदवण्याची प्रक्रियाही सुरू आहे.” असे पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांनी सांगितले. ते म्हणाले की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि दोन समुदायांमध्ये (हिंदू-मुसलमान) शांतता चर्चा सुरू आहे.

दंगलीप्रकरणी सुमारे ७० लोकांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी, कर्फ्यू लागू करण्यात आला. रस्त्यांवरील भगवे झेंडे काढण्यावरून झालेल्या संघर्षानंतर हिंसाचार उसळला. हिंसाचारात तीन पोलिसांसह सुमारे बारा नागरिक किरकोळ जखमी झाले.

रविवारी संध्याकाळी शहरातील लोहारा चौक परिसरात मुसलमान नागरिकांनी भगवे झेंडे काढून जमिनीवर टाकले. मुस्लिम समाजाकडून करण्यात आलेल्या या कृत्यास हिंदू समाजात प्रचंड संतापाचे वातावरण तयार झाले आहे. तेव्हापासूनच शहरात तणाव सुरू आहे. बुधवारी, भाजपा नेत्यांच्या शिष्टमंडळाने या भागाला भेट दिली. भाजपाने सांगितले की शिष्टमंडळाला “पीडित” कुटुंबांना भेटण्याची परवानगी नाही. शिष्टमंडळाच्या सदस्यांनी निषेध म्हणून धरणं आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी कर्फ्यूच हवाला देत ही भेट नाकारली.

हे ही वाचा:

पाकिस्तानला मिळणारी मदत तातडीने थांबवा!

अखेर उघडले दार…

देशभर सुरु आदिशक्तीचा जागर

NCB वर निशाणा साधण्यासाठी नबाब मलिकना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय?

“राज्य सरकार राज्यातील लोकांसाठी अजिबात चिंतित नाही. कवर्धामधील तणावाला सरकार जबाबदार आहे. प्रशासनाने एकतर्फी कारवाई करून परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली केली आहे. जेव्हा आम्हाला पीडितांना भेटायचे आहे, तेव्हा आम्हाला रोखले जात आहे, हे लोकशाहीला शोभा देत नाही.” असं विरोधी पक्षनेते धर्मलाल कौशिक म्हणाले.

Exit mobile version