“मनसुख हिरेनच्या हत्येचे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात ठाकरे सरकारला भय कशाचे वाटते? प्रत्येक आत्महत्या आणि हत्या अनुत्तरित राहावी अशी राज्य सरकारची ईच्छा आहे काय? हत्या करणाऱ्याना अभय कोण देतंय हे जनतेच्या समोर यायलाच हवे.” असे ट्विट भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.
मनसुख हिरेनच्या हत्येचे प्रकरण NIA कडे सोपवण्यात ठाकरे सरकारला भय कशाचे वाटते?
प्रत्येक आत्महत्या आणि हत्या अनुत्तरित राहावी अशी राज्य सरकारची ईच्छा आहे काय? हत्या करणाऱ्याना अभय कोण देतंय हे जनतेच्या समोर यायलाच हवे…— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 8, 2021
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास आता एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहविभागाकडून हा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “याचा तपास एटीएसकडे दिलेला आहे. या व्यतिरिक्त तपास एनआयकडे देण्याचा केंद्राचा डाव असेल तर यात नक्कीच काळंबेरं आहे.” माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटालिया या निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली. त्यातच या कारचे मालक असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीत आढळला होता. यानंतर या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याचं सांगत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एनआयएकडे तपास देण्याची मागणी केली होती.
हे ही वाचा:
त्यानंतर केंद्रीय गृहविभागाने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, “यापूर्वीच हा तपास (महाराष्ट्राच्या) गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिला आहे. आमचा आमच्या यंत्रणांवर विश्वास आहे. या व्यतिरिक्त या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याचा केंद्राचा विचार असेल तर नक्कीच यात काही काळंबेरं आहे.”