पुणे कार अपघात प्रकरणी आरोपी वेदांत अग्रवाल याला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे.तसेच आरोपी विशाल अग्रवाल याच्यासह तिघांना २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.या प्रकरणावर उपमुख्यमंत्री फडणवीस स्वतः लक्ष देऊन आहेत.या प्रकरणावर अनेक सत्ताधारी-विरोधकांनी प्रतिक्रिया दिली.मात्र, प्रत्येक गोष्टीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे या प्रकरणावर गप्पा का?, त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी काही संबंध आहे का?, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आरोपी विशाल अग्रवाल याला काल पुणे सत्र न्यायालयात हजर केले असता त्याच्यासह तिघांना २४ दिवसीय पोलीस कोठडी सुनावली.तसेच आरोपी वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याने त्याला १४ दिवस बालसुधार गृहात पाठवण्याचा निर्णय कोर्टाने दिला.दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजूनही काही भाष्य केलेलं नाही.उपमुख्यमंत्री फडणवीसांवर नेहमी आरोप करून राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे आता गप्पा का?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला.
हे ही वाचा:
भारताने केलेल्या चाबहार बंदराच्या करारावर तालिबान खुश; पाकिस्तानला पाजणार पाणी
‘युट्यूबर’ बनविण्याचे आश्वासन देऊन हिंदू मुलीला अडकवले जाळ्यात!
मध्य प्रदेशात निकाहमध्ये घूमर पाहिल्यानंतर मौलवी संतप्त!
रिझर्व्ह बँकेकडून भारत सरकारला २.११ लाख कोटी रुपये सर्वोच्च लाभांश मंजूर!
नितेश राणे म्हणाले की, नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे आता गप्प का ? आहेत.शरद पवार गटाकडून याबद्दल प्रतिक्रिया का व्यक्त होत नाहीयेत?.प्रत्येक गोष्टीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे या प्रकरणावर गप्पा का? अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध आहेत का? आरोपीचे वकील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. देवेंद्र फडणीसांनी आयुक्तालयात बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या मुलावर कडक कारवाई सुरू आहे.मात्र, यावर सुप्रियाताई गप्प का आहेत, याची माहिती आम्हाला द्यावी.त्यानंतर खूप रहस्य बाहेर येतील, असे आमदार नितेश राणे म्हणाले.