डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. एकीकडे राहुल गांधी हे भाजपाविरोधात लढा देत असल्याचे वारंवार सांगत आहेत. मात्र, त्यांच्या कृतीतून वेगळेच चित्र दिसत आहे. भाजपाशासित राज्यांमधून निवडणूक लढवण्यासाठी राहुल गांधी संकोच करत आहेत, असा हल्लाबोल गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरच्या सांगलदान आणि उखरल भागात जाहीर सभांना संबोधित करताना, डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपाशासित राज्यांमध्ये निवडणूक लढवण्यास राहुल गांधी का कचरत आहेत? का संकोच करत आहेत. एकीकडे राहुल गांधी हे भाजपाशी लढत असल्याचा दावा करत असताना, त्यांची कृती मात्र काहीतरी अन्य सुचवत आहे. भाजपाशासित राज्यांमधून काढता पाय घेत अल्पसंख्याकबहुल राज्यांमध्ये आश्रय का घेत आहेत? असे तिखट सवाल आझाद यांनी राहुल गांधी यांना विचारले आहेत.
हे ही वाचा:
रामनवमीच्या दिवशी ‘जय श्री रामा’चा नारा दिल्याने बेंगळुरूमध्ये तीन जणांवर प्राणघातक हल्ला
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांकडून बिहारी कामगाराची गोळ्या झाडून हत्या
बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हाणामारी; अनेक जखमी
२०१४ मध्ये आशा, २०१९ मध्ये विश्वास अन २०२४ मध्ये मोदींची ‘गँरंटी’
नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला आणि राहुल गांधी हे चमच्याने पोसलेली मुले आहेत असं आझाद यांनी म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. आझाद, हे त्यांच्या पक्षाचे उमेदवार जीएम सरोरी यांच्या समर्थनार्थ प्रचार करत आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. काँग्रेसला थेट संघर्षात सहभागी होण्याची इच्छा नाही. जेथे अल्पसंख्याक लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे तेथे सुरक्षित जागा शोधण्याची प्रवृत्ती काँग्रेसची असल्याचे ते म्हणाले. केरळसारख्या राज्यात सुरक्षित जागा पसंत केल्याचा आरोप करत त्यांनी भाजपाशी जमिनीवर लढण्याच्या पक्षाच्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.