‘सनातन’विरोधात विष पसरवणाऱ्या लोकांसोबत काँग्रेस का बसलीय!

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला सवाल

‘सनातन’विरोधात विष पसरवणाऱ्या लोकांसोबत काँग्रेस का बसलीय!

‘सनातन’विरोधात विष पसरवणाऱ्या लोकांसोबत काँग्रेस का बसली आहे.काँग्रेसची कोणती मजबुरी आहे.ही काँग्रेसची कोणती विचारधारा आहे, काँग्रेसच्या मानसिकतेतील ही विकृती, हा चिंतेचा विषय असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.एनएआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी बोलत होते.

काही महिन्यांपूर्वी द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी अक्षेपार्ह विधान केले होते.यानंतर सर्व स्तरावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली.मात्र, इंडी आघाडीतील नेत्यांनी यावर मौन पाळले.पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी या प्रश्नाला थोड्या वेगळ्या नजरेने पाहतो. माझा प्रश्न काँग्रेसला आहे की, हीच ती काँग्रेस आहे का? जिच्या सोबत महात्मा गांधी यांचे नाव जोडले गेले होते.हीच ती काँग्रेस आहे का? ज्याच्या नेत्या इंदिरा गांधी आपल्या गळ्यात रुद्राक्ष माळा घालून फिरत होत्या.

हे ही वाचा:

‘आप’ला आणखी एक धक्का, आ. अमानतुल्ला खान यांचा जामीन अर्ज फेटाळला!

मणिपूर:हिंसाचारात लुटलेली शस्त्रे ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये ठेवा!

तीन षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने चाहत्याला दिली खास भेट

“पत्राचाळीचे आरोपीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहायला लागले आहेत”

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसला प्रश्न विचारला पाहिजे की, तुमची काय काय मजबुरी आहे, ज्या लोकांनी ‘सनातन’विरोधात विष पसरवले त्यांच्या सोबत तुम्ही का बसले आहात? तुमचे राजकारण अपूर्ण राहणार आहे का? काँग्रेसमध्ये कोणती विकृती निर्माण होत आहे आणि हाच चिंतेचा विषय आहे.द्रमुकचा जन्म कदाचित याच द्वेषातून झाला असावा,आणि लोकदेखील त्यांच्या वक्तव्यांचा स्वीकार करत नाहीयेत.त्यामुळे ती माणसे नवनवीन वक्तव्य करत आहेत.प्रश्न त्यांचा नाहीये तर प्रश्न आहे तो काँग्रेस पार्टीचा.त्यांचे मूळ चारित्र्य हरवले आहे का?, असा सवाल पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला केला.

जेव्हा संविधान सभेमध्ये जे लोक बसले होते ते जास्तकरून गांधीवादी, काँग्रेसच्या विचारधारेची माणसे होती.जेव्हा पहिले संविधान तयार झाले तेव्हा संविधानाच्या प्रत्येक पानावर जी कलाकृती आहे ती सर्व सनातन धर्माशी जोडलेली आहे.जेव्हा संविधान तयार झाले तेव्हा त्याच्या गौरवामध्ये सनातनचाही भाग होता. आज सनातनला मोठ्या प्रमाणात शिव्या घालत आहेत आणि तुम्ही त्यांच्यासोबत मांडीला-मांडी लावून राजकारण करत आहात.त्यामुळे काँग्रेसची हि मजबुरी देशासाठी चिंतेचा विषय आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

Exit mobile version