उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घातली आहे. या उत्पादनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची बेकायदा कमाई केली जात आहे. या पैशांतून भारतविरोधी कारवाया करण्यासाठी दहशतवादी संघटनांना मदत केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. हलाल इंडिया प्रा. लिमिटेड, चेन्नई; जमियत उलेमा हिंद हलाल ट्रस्ट, दिल्ली; हलाल कौन्सिल ऑफ इंडिया, मुंबई; जमियत उलेमा, महाराष्ट्र, मुंबई आदीद्वारा एका विशिष्ट धर्माच्या ग्राहकांना धर्माच्या नावाखाली काही उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र देऊन त्यांची विक्री वाढवण्यासाठी आर्थिक लाभ घेऊन बेकायदा कारभार केला जात असल्याचे दाखल केलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे.
हलाल प्रमाणपत्र काय असते?
हलाल प्रमाणपत्र पहिल्यांदा १९७४मध्ये हत्या केलेल्या मांसाकरिता दिले जाऊ लागले आणि १९९३पर्यंत हे प्रमाणपत्र केवळ मांसाशी संबंधित उत्पादनावर लागू होते. त्यानंतर हे प्रमाणपत्र खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने आणि औषधांवरही लागू केले गेले. अरबी भाषेत हलालचा अर्थ आहे परवानगी मिळालेले आणि हलाल प्रमाणितचा अर्थ इस्लामी कायद्याचे पालन करून तयार केलेल्या भोजनाशी संबंधित आहे. हलाल मांस हे अशा प्रकारच्या प्राण्याचे मांस असते, ज्याच्या गळ्याच्या नस कापून तडफडून मारले जाते. त्यांच्या मानेचे हाड कापून म्हणजे झटका देऊन मारले जात नाही.
हे ही वाचा:
म्हणे – “मुस्लीम दुय्यम नव्हे तर समान नागरिक !”
नूंहमधील हिंसाचार टळला; अल्पवयीनांनी केली होती दगडफेक
मत्स्य विभाग करणार मत्स्यसाठ्याचे संवर्धन
खार पूर्व संक्रमण शिबिरात नागरिकांच्या गैरसोयी दूर करा
हलालवरील बंदीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका
सन २०२२मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून हलाल प्रमाणिकरणावर संपूर्ण प्रतिबंध घालण्याची मागणी करण्यात आली होती. १५ टक्के संख्या असणाऱ्या नागरिकांमुळे ८५ टक्के नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले होते.
चालत्या रेल्वेमध्ये वाद
रेल्वेमध्ये हलालप्रमाणित चहा देण्यावरून प्रवासी आणि एका रेल्वे कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हलाल प्रमाणित चहा काय आहे आणि ती श्रावण महिन्यात का दिली जात आहे, असा प्रश्न या प्रवाशाने विचारला होता. त्यावर रेल्वे कर्मचारी चहा हा शाकाहारीच असल्याचे पटवून देत होता. मात्र आम्हाला आयएयआय प्रमाणपत्र माहीत आहे. हे हलाल प्रमाणपत्र काय असते, अशी विचारणा हा प्रवासी करताना या व्हिडीओत दिसत आहे.