प्रत्येक आरोपीचा बचाव करण्याचा ठाकरे सरकारचा अट्टाहास का?

प्रत्येक आरोपीचा बचाव करण्याचा ठाकरे सरकारचा अट्टाहास का?

मेळघाटातील केवळ २८ वर्षीय तरूण वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या दबावामुळे आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या चिठ्ठीत केला होता. याप्रकरणातील आरोपी एम एस रेड्डी यांना निलंबित करण्यात आले होते. परंतु सरकारने त्यांचे निलंबनच केल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या ट्वीटमध्ये एक पत्र जोडले आहे. या पत्रात त्यांनी रेड्डी यांना अटक करावी व सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. त्याबरोबरच त्यांना हे प्रकरण उच्चस्तरिय समितीकडे सोपवून जलदगती न्यायालयातर्फे याचे काम पाहिले जावे अशी मागणी देखील केली आहे.

त्याबरोबरच या पत्रात शासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्याला वरिष्ठांच्या छळामुळे आत्महत्या करावी लागणे ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नसल्याचे देखील म्हटले आहे.

पहिल्या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनं झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांचे निलंबन होते असे म्हटले आहे.

त्यानंतर त्यांनी सरकार प्रत्येक आरोपित व्यक्तीला वाचवण्याचा अट्टाहास का करत आहे असा सवालही केला आहे? त्याबरोबरच आंदोलनं केल्याशिवाय सरकार हलत नाही असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे.

शेवटच्या ट्वीटमध्ये त्यांनी जलदगती न्यायालय स्थापन करून चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस नियुक्त करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version