आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो, अशी जोरदार टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

भाजपाने जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी टीका केली होती. जन आशीर्वाद यात्रा काढा की कुठल्याही यात्रा काढा जनतेचे आशीर्वाद आम्हालाच आहे, असं राऊत म्हणाले होते. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या खास कोल्हापुरी शैलीतच राऊतांचा समाचार घेतला. आरं बाबा, ज्याची तुला भीती नाही ते वारंवार कशाला बोलतो. तुझ्या दंडात ताकद किती आहे ते बघ रे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या एका विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. या देशाच्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की, कोणी कोणाला काही म्हणू शकतो. त्यामुळे वडेट्टीवार यांचं ते मत आहे. शेवटी राजकारणात कुणाला मतं मिळतं, कुणाचं सरकार येतं यावर ठरत असतं. तुमचं सरकार काही लोकांनी मतं देऊन आलेलं नाही. तुम्ही गिमिक करून सत्तेत आला आहात. मोदी लोकांनी मत दिल्याने आले आहेत. तुम्ही मोदींवर बोलून काय होतंय, असा चिमटा त्यांनी काढला. वडेट्टीवार हे देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे आपलं मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. मोदींनी देशाला पुढे नेलं की खड्ड्यात घातलं हे लोकं ठरवतील. मतपेट्यातून ते दिसतंच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे ही वाचा:

नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान

पुणे मेट्रो विरोधकांना उच्च न्यायालयाचा फटकार

तृणमूलकडून बलात्काराचा राजकीय वापर

काय आहेत आयपीएलसाठीचे नवे नियम?

हा रुटीन दौरा होता. आम्ही वारंवार दिल्लीत जातो. नेक्स्ट जनरेशन उभी केली पाहिजे या हेतूने आमचं काम चालतं. त्यामुळे राम शिंदे, संजय कुंटे, चंद्रशेखर बावनकुळे आदी सर्वांना घेऊन आम्ही दिल्लीत गेलो. मंत्र्यांना भेटणं आणि खातं समजून घेण्यासाठी हा दौरा होता. मोदी-शहांची भेट सोडली तर सर्वांची भेट झाली. अधिवेशनामुळे मोदी आणि शहांची भेट होऊ शकली नाही, असं सांगतानाच या दौऱ्याचा आणि राज्यातील सत्तांतराचा काहीच संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Exit mobile version