व्वा रे व्वा! मुंबईला एक न्याय आणि पुण्याला दुसरा !

व्वा रे व्वा! मुंबईला एक न्याय आणि पुण्याला दुसरा !

ठाकरे सरकारने सोमवार, २ ऑगस्ट रोजी कोरोना विषयक नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये ११ जिल्हे वगळता इतर सर्व राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण यावरूनच आता नवा वाद पेटण्याची शक्यता दिसत आहे.

कारण ठाकरे सरकारच्या या निकषावरून त्यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. ‘मुंबई आणि पुण्याला वेगळा न्याय का?’ असा सवाल मोहोळ यांनी विचारला आहे.

ठाकरे सरकारने सोमवारी घेतलेल्या नव्या निर्णयानुसार राज्यातील ११ जिल्हे असे आहेत जिथे तिसऱ्या पातळीचे निर्बंध चालू राहणार आहेत. या मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर. या जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर या ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांतील निर्बंध हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठरवणार आहे.

हे ही वाचा:

सरकार आता चिठ्ठी काढून निर्बंध-अनिर्बंधचा खेळ खेळतेय

हॉकीतील पराभवावर काय म्हणाले मोदी?

सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?

सर्वांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावा

पण या वरूनच पुण्याच्या महापौरांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला सवाल केला आहे. मुंबई आणि पुण्याला सरकार वेगवेगळा न्याय लावत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुणे शहरात सलग महिनाभर पॉझिटिव्हीटी रेट हा ५ टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला आहे. तर सध्याच्या घडीला पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी ४ टक्क्यांच्या आत आहे. असे असतानाही पुण्यात लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे असे मत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version