नार्वेकरांच्या अनधिकृत बंगल्यावर कारवाई का नाही?

नार्वेकरांच्या अनधिकृत बंगल्यावर कारवाई का नाही?

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचे सचिव मिलिंद नार्वेकरचा सी आर झेड मधील मुरूड दापोली येथील अनधिकृत बंगलो वर अजून कारवाई का केली नाही? पर्यावरण मंत्रालय, तहसीलदार, विभागीय अधिकारी यांना मी काल हा प्रश्न विचारला. बांधकाम तोडावे, गुन्हा दाखल करावा अन्यथा मी न्यायालयात जाणार, इशारा दिला.” असं ट्विट किरीट सोमैय्यांनी केलं आहे.

सोमय्या यांनी काल दापोलीतील नार्वेकरांच्या बंगल्याची पाहणी केली. त्यानंतर आज मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. नार्वेकरांचा दापोलीतील बंगला अनधिकृत आहे. तो बंगला पाडण्याचे आदेश दिले आहेत. तर मार्वेकर यांनी बंगला पाडला अशी माहिती मंत्रालयात दिल्याचा दावा सोमय्या यांनी केलाय. ४ हजार स्क्वेअर फुटाचा बंगला बांधतात, नियमांचं उल्लंघन करतात, नार्वेकर काय महाराष्ट्राचे जावई आहेत का? अशा शब्दात सोमय्या यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारलाय.

हे ही वाचा:

…म्हणे भारताचे प्रकल्प सुरक्षित

तालिबानने बामियानमध्ये आता ‘हा’ पुतळा उध्वस्त केला

तालिबानवर विश्वास ठेवता येणार नाही

रौप्य पदक जिंकूनही मोदींची रवी दहियाकडे तक्रार का?

दुसरीकडे शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव अडचणीत आल्या आहेत. आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केलीय. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीविषयी चुकीची माहिती दिल्याचा ठपका देऊन आयकर विभागाने त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर किरीय सोमय्या यांनी प्रश्न उपस्थित केलाय. ही जी कंपनी आहे, त्यांच्यासोबत तुमच्या आर्थिक व्यवहाराची माहिती देणार का? हवालाच्या मार्फत यूएए सिनर्जी व्हेंचर्समध्ये पैसे गुंतवले. ते पैसे भारतातून ट्रान्सफर करण्यात आले आहेत, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. यशवंत जाधव यांनी काळ्याचं पांढरं केलं. मात्र, तो काळा पैसा आला कुठून? हा पैसा महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टचा आङे. त्यामुळे यशवंत जाधव यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

Exit mobile version