मी दिलेला सल्ला शरद पवारांच्या पचनी पडेल का? उद्धव ठाकरे यांनी मारला टोमणा

पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंचा सवाल

मी दिलेला सल्ला शरद पवारांच्या पचनी पडेल का? उद्धव ठाकरे यांनी मारला टोमणा

उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नव्हते. ते केवळ दोन वेळा मंत्रालयात गेले हे पचनी पडणारं नव्हतं, असा उल्लेख शरद पवार यांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकात केला आहे, त्याला उद्धव ठाकरे यांनी टोमण्यामध्ये प्रत्युत्तर दिले. शरद पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, त्यांना मी कसा काय सल्ला देणार? तो त्यांच्या पचनी पडेल का? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी टोमणा मारला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचा अंतिम निर्णय होईपर्यंत आपण थांबलं पाहिजे. त्यांचा निर्णय होऊ द्या. मग बोलेन, असं उद्धव ठाकरेंनी म्हणत सावध पवित्रा घेतला आहे. मी शरद पवार यांना सल्ला कसा देणार? आणि माझा सल्ला पचनी पडेल का? असं विधानही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

शरद पवारांशी माझं बोलणं झालं नाही. त्यांना मनाप्रमाणे काही करण्याचा अधिकार आहे. कार्यकर्त्यांचाही त्यांच्यावर अधिकार आहे. ते सर्वांच्या हितााच निर्णय घेतील. त्यांचा निर्णय अंतिम झाल्यावर प्रतिक्रिया देणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईबाबत माझ्या मतावर मी ठाम आहे. माझी मते मी मांडली आहेत. मविआला तडा जाईल असं मी बोलणार नाही. मला व्यक्तीचा नाही तर वृत्तीचा पराभव करायचा आहे. हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, अशी वक्तव्यही उद्धव ठाकरेंनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय बजरंग बली म्हणून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढला होता. आता मोदींनी बजरंगबली की जय म्हणून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कायद्यात बदल केला का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला केला आहे.

हे ही वाचा:

लष्कराचे हेलिकॉप्टर चिनाब नदीत कोसळले

मुंबईतील बिबटे माणसांसोबत जीवन जगू शकतील का?

‘गो फर्स्ट’च्या वैमानिकांची एअर इंडिया, इंडिगोच्या ‘कॉकपिट’वर नजर

सर्बियात १३ वर्षांच्या मुलाने शाळेत आठ मुलांना घातल्या गोळ्या

नरेंद्र मोदी जर जय बजरंग बली म्हणून मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. तर तुम्हीही जय भवानी, जय शिवाजी म्हणून मतदान करा. कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रात तुमची एकजूट दाखवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Exit mobile version