राहुल गांधींचे पत्र मिळाले… संजय राऊत यांनी २२ दिवसांनी शेअर केले!

राहुल गांधींचे पत्र मिळाले… संजय राऊत यांनी २२ दिवसांनी शेअर केले!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना १५ फेब्रुवारीला पत्र लिहिले होते. ज्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. संजय राऊत यांनी सुमारे २२ दिवसांनी हे पत्र सार्वजनिक केले असून, त्यांनी ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. मात्र २२ दिवसांनी हे पत्र संजय राऊतांनी का शेअर केले हा प्रश्न सर्वाना पडला आहे.

राहुल गांधींनी पत्रात लिहिले आहे की, संजय राऊत, मला आशा आहे की तुम्हाला हे पत्र मिळाले असेल. ‘आप’ ने ८ फेब्रुवारी रोजी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले होते, ज्याच्या समर्थनार्थ हे पत्र लिहिले आहे. संजय राऊत यांना उद्देशून राहुल गांधींनी लिहिले आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांकडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना त्रास दिला जात आहे. ज्याचा मी निषेध करतो. तुम्ही ज्या प्रकारे एजन्सींच्या गैरवापराची माहिती दिली आहे, ते मोदी सरकारचा पर्दाफाश करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा सततचा गैरवापर लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी पुढे लिहिले आहे. काँग्रेस सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे मी तुम्हाला आश्वासन देतो, असे राहुल गांधींनी लिहिले आहे.

त्याचवेळी हे पत्र संजय राऊत यांनी ट्विटरवर शेअर करत पत्रासोबत कॅप्शन लिहिले आहे. या कॅप्शन त्यांनी लिहिले आहे की, ” राहुल गांधी धन्यवाद! लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात आपण सर्वांनी मिळून लढा दिला पाहिजे.”

हे ही वाचा:

नवाब मलिकसारखी व्यक्ती मंत्रिमंडळात होती, याचे बाळासाहेबांना काय उत्तर देणार?

सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते आहे का?

युक्रेनच्या सुमी शहरातून भारताने बाहेर काढले ६९४ विद्यार्थी

भारतातून हवाई सफर होणार पूर्ववत

मात्र, संजय राऊत यांनी २२ दिवसांनी हे पत्र सार्वजनिक केले आहे. हे पत्र १५ फेब्रुवारीला लिहिले होते. अखेर संजय राऊत यांनी काँग्रेसला २२ दिवस पाठिंब्याचे पत्र का उघड केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एक दिवस आधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मुंबई पोलिसांत ईडीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Exit mobile version