राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू असून नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे बेळगाव दौऱ्यावर होते. नुकतेच
बेळगावहून फडणवीस कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहचले. यावेळी त्यांनी मी पुन्हा येईन असे वक्तव्य केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत शिवसेनेतील एकूण १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणी काही दिवसांत निकाल लागणं अपेक्षित आहे. त्यामुळे फडणवीस यांचे हे वक्तव्य संभ्रमात टाकत असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे.
“मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहीत आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो,” असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडमधील निट्टूर गावात केले.
हे ही वाचा:
सर्बिया पुन्हा हादरले!! गोळीबाराच्या घटनेत आठ जणांचा मृत्यू
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री तब्बल १२ वर्षांनी भारतात, केली होती ‘ही’ भारताविरोधात वादग्रस्त विधानं
दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प, हजारो भाविक अडकले
पवारांनी सांगितले आणखी १-२ दिवस थांबा!
सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय खंडपीठासमोर राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. हा निकाल खंडपीठाने राखून ठेवला असून येत्या १६ मे रोजी यातील एक न्यायमूर्ती निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच हा निकाल लागणं अपेक्षित आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.