बीडचे भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. भगीरथ बियाणी यांनी गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, बियाणी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
भगीरथ बियाणी यांनी आज सकाळी गोळी झाडून आत्महत्या केली. ते बीड शहरातील एमआयडीसी परिसरात राहत होते. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी भगीरथ बियाणींना मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच खासदार प्रीतम मुंडे घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
हे ही वाचा:
डी कंपनीच्या पाच जणांना घेतले ताब्यात
गुगलने कान्होजी आंग्रे यांच्याबाबतीतली ‘ती’ चूक सुधारली
… म्हणून सुरक्षा कवच सोडून जनतेला भेटायला गेले पंतप्रधान मोदी
गुगलने कान्होजी आंग्रे यांच्याबाबतीतली ‘ती’ चूक सुधारली
भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्या करण्यामागे काही राजकीय अथवा कौटुंबिक कारण आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.