राजेश टोपेंना शहाणपण आग लागेपर्यंत का सुचले नाही

राजेश टोपेंना शहाणपण आग लागेपर्यंत का सुचले नाही

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण दररोज हजारोंच्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर खूप ताण आला आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याच्या प्रयोगाच्या घोषणेमुळे सरकारचा तहान लागल्यावर विहीर खणण्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्वीट करून टोपेंना लक्ष्य केले आहे.

हे ही वाचा:

‘पोयला बौशाख’ निमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

कोरोनाची चेन वाढतच आहे

कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू

राज्यात काल ११ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यु झाला. राज्यावर ऑक्सिजनचे संकट गहिरे झाल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना हवेतून ऑक्सिजन घेऊन त्याचे शुद्धीकरण करून मग वापरण्याची कल्पना सुचली. आमदार अतुल भातखळकर यांनी याच मुद्द्यावर मंत्र्यांवर टिका केली आहे. ते ट्वीट मध्ये म्हणतात,

राज्य व्हेंटिलेटरवर असले तरी मंत्री महोदयांचा प्रसिद्धीचा सोस काही कमी होत नाही. अशा घोषणा करून टाळ्या घेताना हे शहाणपण आग लागे पर्यत का सुचले नाही याचे उत्तर द्या राजेश टोपे

राज्यात सध्या व्हेंटिलेटर सोबतच ऑक्सिजनेटेड बेड्स, साधे बेड्स रेमडेसिवीर इत्यादींचा प्रचंड तुटवडा आहे. राज्यातून या औषधाला खूप मागणी आहे. परंतु ठाकरे सरकारकडून याबाबत अत्यंत धीम्या गतीने कारवाई होताना दिसत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवर चहूबाजूने टीका होत आहे.

Exit mobile version