प्रत्येक वेळी काँग्रेसची देशविरोधी भूमिकाच कशी?

प्रत्येक वेळी काँग्रेसची देशविरोधी भूमिकाच कशी?

महाराष्ट्र्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टूलकिटच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. प्रत्येक वेळी काँग्रेस देशविरोधी भूमिकाच कशी काय घेते? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. मंगळवारी रात्री ट्विटरच्या माध्यमातून फडणवीसांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे

मंगळवार, १८ मे रोजी समाज माध्यमांवर एक टूलकिट फिरू लागले. या टूलकिटवर काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. तर काँग्रेसच्या एका संशोधन समितीने टूलकिट बनविल्याचे त्या टूलकिटमध्ये म्हटले आहे. कोविड महामारीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला आणि भारतीय जनता पार्टीला कशाप्रकारे लक्ष्य करावे याचे मुद्दे या टूलकिटमध्ये मांडण्यात आले आहेत. या टूलकिटमध्ये अनेक धक्कादायक बाबींचा उल्लेख केला आहे. सारे जग ज्या कोरोना व्हायरसला वूहान व्हायरस म्हणते त्याच्या नव्या स्ट्रेनला ‘भारतीय स्ट्रेन’ अथवा ‘मोदी स्ट्रेन’ म्हणावे असे या टूलकिटमध्ये सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोहही करू शकते

देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या कोंकण दौऱ्यावर

काँग्रेस गिधाडांप्रमाणे प्रेतांवर नजर ठेवून आहे

कोरोनाला ‘इंडियन व्हायरस’ म्हणत चीनी देणग्यांची परतफेड

टूलकिटमधल्या याच मुद्द्यावरून फडणवीसांनी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र आहे. “आपल्या सगळ्यांमध्ये विचारधारा, मते, श्रद्धा यांचे मतभेद असू शकतात. पण तरीही काँग्रेस पक्ष ‘इंडियन स्ट्रेन’ हा शब्द वापरायला एवढा उत्सुक का होता? प्रत्येक वेळी देश विरोधी भूमिका कशी?” असा सवाल फडणवीसांनी ट्विटमधून विचारला आहे.

या टूलकिट विषयावरून भारतीय जनता पार्टी आणि नेटकरी हे काँग्रेस विरोधात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ट्विटरवर #CongressToolkitExposed हा हॅशटॅग ट्रेंडिंग राहिला असून साडे चार लाखांपेक्षा अधिक ट्विट्समध्ये तो वापरला गेला आहे.

Exit mobile version