राष्ट्र शब्दच संविधानात येत नाही म्हणत काँग्रेस अपमान का करत आहे?

राष्ट्र शब्दच संविधानात येत नाही म्हणत काँग्रेस अपमान का करत आहे?

लोकसभेत पंतप्रधान मोदींनी केला घणाघात

लोकसभेत बजेटवरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत हे राष्ट्र नव्हे राज्यांचा समूह आहे, या केलेल्या विधानावर जोरदार टीका झाली होती. तोच धागा पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर आघात केले. राष्ट्र म्हणजे काय यासंदर्भात नेहरूंनी जे लिहिले आहे त्याचा विसर काँग्रेसला पडला आहे. आता तर काँग्रेस ही टुकडे टुकडे गँगची लीडर बनली आहे, असे मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की, सभागृहात देशाबद्दल काही गोष्टी बोलल्या गेल्या त्या चिंताजनक आहेत. मी कोट करतो की, बंगाली, मराठे, गुजाराती, तमिळ उडिया, असामी, कन्नड, मल्याळी, सिंधी, पंजाबी, पठाण, कश्मीरी, राजपूत आणि हिंदुस्थानी भाषांचा असा विशाल मध्यभाग कसा एकत्र आहे, शेकडो वर्षे स्वतःची ओळख टिकवून आहे. वैविध्यांनी भरलेला आहे. त्याची माहिती पुरातन परंपरांमधून मिळते. या भारतीयांचा वारसा एकही होता व त्यांची नैतिक व मानसिक विशेषतः पण एकच होती.

या भारतीयांच्या विशेषतः सांगताना दोन शब्द राष्ट्रीय आणि वारसा हे महत्त्वाचे शब्द. हे पंडित नेहरूंचे कोट आहेत. त्यांच्या ‘भारत एक खोज’मध्ये ही वाक्ये आहेत. आपला वारसा एक आहे. नैतिक व मानसिक विशेषतः एक आहे. राष्ट्राशिवाय हे शक्य आहे? पण अपमान केला गेला की, राष्ट्र शब्दच आपल्या संविधानात येत नाहीत. काँग्रेस हा अपमान का करत आहे?

मोदी म्हणाले की, राष्ट्र हे सत्ता व सरकारची व्यवस्था नाही. राष्ट्र एक जीवित आत्मा आहे. यामुळे हजारो वर्षांपासून देशवासी जोडले गेले आहेत, झुंजत आहेत. आपल्याकडे विष्णू पुराणात लिहिले आहे. हे भाजपने लिहिलेले नाही. ‘समुद्राच्या उत्तरेला व हिमालयाच्या दक्षिणेला जो देश आहे त्याला भारत म्हणतात तसेच त्यांच्या वंशजांना भारती म्हणतात.

एक क्षण येतो पण इतिहासात जेव्हा आपण जुन्यातून बाहेर येऊन नव्यात प्रवेश करतो.

तामिळ भाषेतील कवी सुब्रमण्यम भारतींचे उद्गार मोदींनी ऐकवून दाखविले. प्रथम तामिळ भाषेत लिहिलेली ही कविता त्यांनी ऐकविली नंतर त्याचा हिंदी अनुवादही सांगितला.

ते म्हणाले, भारती यांनी म्हटले होते की,

सन्मानित जो सकल विश्व मे महिमा जिनकी बहोत रही है

अमर ग्रंथ वे सभी हमारे, उपनिषदो का देश यही है

गायेंगे यश हम सब इसका, यह है स्वर्णीम देश हमारा

आगे कौन जगत मे हमसे, यह है भारत देश हमारा

हा त्यांच्या कवितेचा भाव आहे. ही आपली संस्कृती आहे.  मी तामिळी नागरिकांना सलाम करतो.

मोदींनी तामिळी नागरिकांच्या देशप्रेमाचे उदाहरणही दिले. ते म्हणाले की, सीडीएस रावत यांचे दक्षिणेत अकस्मात निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर तामिळनाडूत रस्त्यावरून जात होते तेव्हा तमिळ बंधू भगिनींनी रांगेत उभे राहून साश्रुपूर्ण नयनांनी ‘वीर वणक्कम’ अशा घोषणा देत त्यांचा जयजयकार केला. हा माझा देश आहे.

हे ही वाचा:

देशाची थट्टा उडवता, म्हणून काँग्रेस थट्टेचा विषय बनला आहे!

या राज्यात उभारणार लता दीदींच्या नावे संगीत अकादमी आणि संग्रहालय

अरुणाचलमध्ये हिमस्खलनात लष्कराचे सात जवान अडकले 

अहमदाबाद संघाचे झाले बारसे…’हे’ असणार नाव

 

पण काँग्रेसला नेहमीच या गोष्टीचा त्रास होतो. विभाजनवादी मानसिकता त्यांच्यात भिनली आहे. फोडा आणि राज्य करा, ही त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे काँग्रेस तुकडे तुकडे गँगची लीडर बनली आहे.

मोदी म्हणाले की, आमच्याकडे म्हटले जाते. विद्यार्जन आणि ज्ञानासाठी एकेक क्षण महत्त्वाचा असतो. संपत्ती, सुविधांसाठी एकेक कण महत्त्वाचा असतो. क्षण गमावला तर ज्ञान मिळत नाही आणि कण बरबाद केला तर सुविधा व्यर्थ असतात. काँग्रेसला मी सांगू इच्छितो. हे मंथन जरूर करा. हे क्षण तुम्ही नष्ट तर करत नाहीत ना? माझ्या पक्षावर, माझ्यावर टीका करा. पण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सावानिमित्त भारताच्या विकास यात्रेत सकारात्मक योगदान हवे. सगळ्यांना मी सांगू इच्छितो की, या अमृतमहोत्सवानिमित्त आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी एकजूट होऊन प्रयत्न करू. देशभावनेने करू. राजकारण बाजूला ठेवू.

 

Exit mobile version