देशद्रोही कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) अटक झालेल्या फा. स्टॅन स्वामी याच्या निधनाबद्दल राहुल गांधी यांच्यासह तमाम लिबरल, डावे हे अश्रु ढाळत आहेत. पालघरमध्ये साधूंना ठेचून मारले तेव्हा यांची वाचा गेली होती का? किती पुरावे द्यावेत यांच्या हिंदूद्रोहाचे, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी या मंडळींना चांगलेच फैलावर घेतले आहे.
भीमा कोरेगाव दंगलप्रकरणातील मुख्य आरोपी आणि यूएपीए या कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या फा. स्टॅन स्वामीचे तुरुंगात निधन झाल्यानंतर मंगळवारी राहुल गांधी यांच्यासह सीताराम येचुरी, रामचंद्र गुहा, शशी थरूर आदि मंडळींनी त्यांच्या निधनाबद्दल अश्रु ढाळले आहेत. पण याच मंडळींनी गेल्या वर्षी झालेल्या साधूंच्या अत्यंत भयानक अशा हत्येनंतर मात्र एकही शब्द काढला नव्हता. यावरून या मंडळींचा ढोंगी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे.
हे ही वाचा:
नागरी विमान मंत्रालयाकडून विमानातील प्रवाशांच्या अधिकतम मर्यादेत सूट
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांच्या पोटात खड्डा!
२ महिन्यात राज्यातील ७ कोटी ‘गरिबांचे कल्याण’
ठाकरे सरकार, आता तरी लोकलमध्ये शिरू द्या!
२०१७मध्ये झालेल्या भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात स्टॅन स्वामी केंद्रस्थानी होता. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने १० हजार पानी आरोपपत्रही दाखल केले होते. त्यात देशद्रोही कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (यूएपीए) ही कारवाई करण्यात आली होती. बंदी घालण्यात आलेल्या कम्युनिस्ट पार्टी-माओ या अतिरेकी संघटनेच्या माध्यमातून स्टॅन स्वामीच्या कारवाया सुरू असल्याचा आरोप त्याच्यावर होता. भारत सरकारविरोधात दहशतवादी गट उभे करण्याचा प्रयत्न स्वामीकडून सुरू असल्याचे स्पष्ट होत होते. दलित आणि मुस्लिमांना सशस्त्र प्रशिक्षण देण्याची योजना त्याने आखली होती, असाही त्याच्यावर आरोप होता. अशा व्यक्तीसाठी दुःख व्यक्त करण्याची चढाओढ काँग्रेस आणि डाव्या पक्षांमध्ये लागली आहे.