दिल्ली महापालिकेत स्थायी समितीत नगरसेवकांनी बाटल्या फेकल्या, ठोसे लगावले

पाण्याच्या बाटल्या फेकत घातला गोंधळ

दिल्ली महापालिकेत स्थायी समितीत नगरसेवकांनी बाटल्या फेकल्या, ठोसे लगावले

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राजधानी दिल्लीमध्ये महापौर आणि उपमहापौर या पदासाठीच्या निवडणूक पार पडल्या. महापौर पदासाठी भाजपच्या रेखा  गुप्ता   यांचा शैली ओबेराय यांनी पराभव केला. तर उपमहापौर पदासाठी आप पक्षाने बाजी मारली. त्यानंतर स्थायी समितीची निवडणूक सुरु असताना महापालिकेमध्ये आप  पक्षाचे आणि भाजपचे नगरसेवक एकमेकांवर आपापसात भिडले तेव्हा त्यांनी एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या आणि त्यांच्यामध्ये धक्काबुक्की करत मारामारीसुद्धा झाली.

यात मतपत्रिकेचा डब्बा सुद्धा वेलमध्ये फेकण्यात आला त्यामुळे सभागृहात कारवाई होऊ शकली नाही, स्थायी समिती निवडणूकीची प्रक्रिया थांबवून भाजप ती पुन्हा सुरु करण्याची मागणी करत आहे.

 

दिल्ली महापालिका निवडणुकीत महापौर पदाच्यासाठी शैली ओबेरॉय १५० मते मिळून विजयी झाल्या, तर भाजपच्या रेखा गुप्ता यांना ११६ मते मिळाली. त्यानंतर उपमहापौर पदाची निवडणूक शांततेत पार पडली. पण स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. त्यामुळेच दिल्ली महानगर पालिकेचे रात्रभर कामकाज कधी एक तास तर कधी अर्धा तास तहकूब करावे लागले.

नगरसेवकांनी एकमेकांवर बाटल्या फेकायला सुरवात केल्यावर काही नगरसेवक हे सभागृहाच्या बाहेर गेले. तर काही नगरसेवक टेबलाखाली लपून बसले होते.

हे ही वाचा:

खलिस्तानवाद्यांची भ्याड धमकी; इंदिरा गांधींबाबत जे झाले तसेच अमित शहांच्या बाबतीत होईल!

आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज…

संजय राऊत म्हणतात, श्रीकांत शिंदेंनी मला मारण्याची सुपारी दिली!

शिंदे आणि ठाकरे गट काय युक्तिवाद करणार ?

आप पक्षच्या नेत्या अतिशी या त्यांच्या नेत्यांना समजावण्याचा प्रयन्त करत होत्या पण सगळे नगरसेवक आक्रमक झाले होते. या सगळ्या मारामारीमुळे   स्थायी सदस्यांची निवडणूक झालेली नसून फक्त पाच नगरसेवकांना बोलावून मतपत्रिका देऊन मतदान करायला सांगितले. पण त्यांनी त्यास नकार दिला.   महापौरांनी मतपत्रिका देण्याची मागणी करून सुद्धा नगरसेवकांनी मतपत्रिका दिली नाही. त्यानंतरच वादाला सुरवात झाली हे फार धक्कादायक असल्याचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी म्हंटले आहे.

Exit mobile version