मराठा समाजातील सगेसोयऱ्यांच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरूच आहे.राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे.मात्र, सगेसोयऱ्यांना देखील ओबीसी दाखले देण्याची मागणी त्यांनी केली.आज पत्रकार परिषदेत घेत जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध स्वरूपाचे आरोप केले आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे रवाना झाले.मनोज जरांगेच्या भूमिकेवर सत्ताधारी नेत्यांनी आक्षेप घेतला.मनोज जरांगे यांचा बोलावता धनी कोण आहे, हे पाहण्याची गरज असल्याचे म्हणाले आहेत.जरांगे यांच्या भूमिकेवर भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, मनोज जरांगेना बोलण्यासाठी कोणाकडून स्क्रिप्ट लिहून येते, ते लवकरच कळेल.
आमदार नितेश राणे म्हणाले की, मला अजूनही एक कोडं आहे, ते सुटलेले नाही.ते म्हणजे मनोज जरांगे यांचे जे आंदोलन आहे, ते कशासाठी आहे.जरांगेचे आंदोलन हे मराठा समजासाठी आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने राजकारण करण्यासाठी आहे.नेमकं जरांगेना स्क्रिप्ट येतं कुठून?.कारण मराठा समाज राहिला बाजूला, समाजचे हित राहिले बाजूला.सगेसोयऱ्यांची ही जी काही मनोज जरांगेची यांची मागणी आहे.यावर सरकार काही-ना- काही तरी तोडगा काढेल.पण त्या निमित्त्याने फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात आहे, ,मनोज जरांगे यांनी हे सुद्धा लक्षात ठेवावं की, आम्ही सुद्धा मराठा समाजाचे आहोत.
हेही वाचा..
महिनाभरात रामलल्लाच्या चरणी २५ किलो सोने, चांदीचे दागिने अर्पण
पुढील तीन महिने ‘मन की बात’ ला सुट्टी
राष्ट्रध्वजाला म्हटले ‘सैतानी’; फ्रान्सने केले मुस्लिम धर्मगुरूला हद्दपार
अशोक चव्हाण कामाला लागले; तब्बल ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश!
सागर बंगल्यापर्यंत पोहचण्याअगोदर एक भिंत म्हणून आम्ही पण तिथे उभे आहोत.पहिली आमची भिंत पार करा, मग सागर बंगल्यापर्यंत पोहचण्याचा विचार करा.ते पुढे म्हणाले की, मनोज त्यांची स्क्रिप्ट नेमकी कोणाची आहे?, स्क्रिप्ट कोणाकडून लिहून येते, हे नुसतं वाचून दाखवत आहेत.कारण एका बाजूला तुम्हाला मराठा समाजाचे तुम्हाला हित बघायचे आहे.मराठा समाजाचे नेते बनायचे आहे, मग फक्त आणि फक्त तुम्ही फडणवीस यांनाच का टार्गेट करताय? बाकीच्या नेत्यांचे नाव का तुम्ही घेत नाही.का कधी पवार साहेबांचं नाव घेत नाही, उद्धव ठाकरे यांचे देखील का नाव घेत नाही.का कधी राहुल गांधीचं नाव घेत नाही.अशा वागण्यामुळे राजकारणाचा वास यायला लागला आहे. म्हणून आज नाहीतर उद्या कळेलचं मनोज जरांगे यांची स्क्रिप्ट कोणाची आहे ते, असे नितेश राणे म्हणाले.