28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणएमसीए निवडणुकीत राजकारणी जिंकणार की संदीप पाटील?

एमसीए निवडणुकीत राजकारणी जिंकणार की संदीप पाटील?

२० ऑक्टोबरला होणार मतदान आणि लागणार निकाल

Google News Follow

Related

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक २० ऑक्टोबरला होत आहे. देशातील एक नामांकित क्रिकेट संस्था असल्यामुळे आणि राष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुंबईचा आतापर्यंत दबदबा राहिलेला असल्यामुळे अर्थातच या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष असते. पण यावेळची निवडणूक वेगळी आहे ती राजकारण्यांचा मोठ्या प्रमाणावर त्यात सहभाग असल्यामुळे.

भारताचे माजी क्रिकेटपटू व राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील हे तडाखेबंद फलंदाज म्हणून ओळखले गेले आहेत, आता निवडणुकीत ते कशी फटकेबाजी करतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे. अर्थात, ही फलंदाजी सोपी नाही. त्यांच्यासमोर अमोल काळे यांचे आव्हान असेल. अमोल काळे हे क्रिकेटपटू नव्हेत. पण आज त्यांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खुद्द शरद पवारही मैदानात असल्यामुळे या निवडणुकीला वेगवेगळे कंगोरे प्राप्त झाले आहेत.

निवडणुकीची घोषणा झाल्यापासून या निवडणुकीत वेगवेगळे रंग भरायला सुरुवात झाली. शरद पवार गट म्हणून संदीप पाटील हेच या गटातून अध्यक्षपदाचे उमेदवार होते. मात्र नंतर आशीष शेलार यांनी मैदानात उडी घेतल्यावर शरद पवार आणि शेलार एकत्र आले आणि मग शरद पवार गटाने पवारांचे नाव काढून त्याला मुंबई क्रिकेट ग्रुप असे नाव ठेवले. शेलार गटातून अमोल काळे हे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांना शरद पवारांचा पाठिंबा आहे. अमोल काळे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे एकीकडे काळे यांना असलेला राजकीय पाठिंबा आणि दुसरीकडे क्रिकेटपटू संदीप पाटील यांची क्रिकेटमधील कारकीर्द असा सामना निवडणुकीत रंगणार आहे.

या निवडणुकीसाठी स्नेहभोजनाचे कार्यक्रमही करण्यात आलेले आहेत. त्यातून मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न आहे. राजकीय व्यक्ती आणि क्रिकेटपटू यांच्यातील सामन्यात विजय कुणाचा होणार हे मतदार ठरविणार आहेत. पण अर्थातच संदीप पाटील यांना ही लढाई सोपी नाही.

हे ही वाचा:

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’

काठमांडूला भूकंपाचे धक्के

पार्ले बिस्कीट आता सातासमुद्रापलिकडे झेपावणार

 

खजिनदार आणि सचिवपदासाठीही चुरस आहे. खजिनदारपदासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी जगदीश आचरेकर उभे असून ते याआधीच्या कार्यकारिणीतही खजिनदार होते. त्यांच्याविरोधात संजीव खानोलकर, अरमान मलिक उभे आहेत. तर सचिवपदासाठी दोन्ही गटातून अजिंक्य नाईक हेच आहेत. त्यांना टक्कर देणार आहेत. मयांक खांडवाला आणि माजी अध्यक्ष रवी सावंत यांचे पुत्र नील सावंत. तर कौन्सिलच्या ९ जागांसाठी तब्बल २३ उमेदवार आहेत. त्यात शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासारखी राजकारणातली मंडळी आहेत. एकूणच ३२९ मतदारांपुढे आव्हान मोठे असेल पण त्यांना आपल्याकडे वळविण्यात राजकारणी मंडळी यशस्वी ठरतात की, संदीप पाटील यांचा निभाव लागतो, हे पाहायचे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा