आज लोकसभा निवडणुका झाल्यास कोण मारणार बाजी?

ताज्या सर्वेक्षणात आली आकडेवारी समोर

आज लोकसभा निवडणुका झाल्यास कोण मारणार बाजी?

पुढील वर्षी देशभरात लोकसभा निवडणुका होत आहेत. मात्र निवडणुकीआधीच विरोधी पक्षांनी ‘I.N.D.I.A.’ या आघाडीची स्थापना केली आहे. त्यांच्याशी लढण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए समर्थ आहे. काँग्रेस, जनता दल, आम आदमी पक्षासह २६ पक्षांचे नेते बैठकांवर बैठका घेऊन रणनिती आखून भाजपला पराभूत करण्याचे दावे करत आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात हा दावा सोपा नसल्याचे उघड झाले आहे. भाजपला २८८ ते ३१४ जागा तर काँग्रेसला ६२ ते ८० जागा मिळू शकतील, असा अंदाज या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.  

टाइम्स नाऊ नवभारत आणि ईटीजी यांनी केलेल्या ताज्या सर्वेक्षणात सन २०२४मध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार पुन्हा स्थानापन्न होण्याची चिन्हे आहेत. विरोधी आघाडी ‘इंडिया’ला १६० ते १९० जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र मतटक्क्यांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. एनडीएला ४२ टक्के तर इंडियाला ४० टक्के मतटक्का मिळू शकतो. हे सर्वेक्षण पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर करण्यात आले आहे.    

सर्वेक्षणानुसार, एनडीएला २९६ ते ३२६ जागा मिळू शकतात. तर, ‘इंडिया’ आघाडीला १६० ते १९० जागा मिळू शकतात. वायएसआरसीपीला २४ ते २५, बीआरएसला ९ ते ११, बीजेडीला १२ ते १४ आणि अन्य पक्षांना ११ ते १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात एनडीए चांगली कामगिरी करत असल्याचे दिसते आहे. येथील ८० जागांपैकी एनडीएला ६९ ते ७३ जागा मिळू शकतात. तर, इंडिया आघाडीला पाच ते नऊ जागा मिळण्याची शक्यता आहे. अन्य पक्षांना एक ते तीन जागा मिळू शकतात.

हे ही वाचा:

ग्रीसमध्ये ऊन खाणेही झाले महाग; समुद्रकिनाऱ्यावरील खुर्च्यांचे दर वाढले, सुरू झाली टॉवेल चळवळ

डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. व्ही. एस. अरुणाचलम यांचे निधन

ताडदेव लूट तसेच वृद्धेच्या हत्येप्रकरणातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

गुलाम नबी आझाद म्हणतात, मुस्लिमांचे पूर्वज हे हिंदूच!  

सर्वेक्षण एजन्सीने एक लाख १० हजार ६६२ लोकांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये ६० टक्के लोकांकडून फोनवरून माहिती घेतली गेली तर, बाकीच्या लोकांना प्रत्यक्ष भेटण्यात आले. हे सर्वेक्षण १५ जून ते १२ ऑगस्टदरम्यान केले गेले.  

राज्यांमध्ये किती जागा?

मध्य प्रदेशमध्ये एनडीएला २४ ते २६तर, ‘इंडिया’ला तीन ते पाच जागा मिळू शकतात. राजस्थानमध्ये एनडीएला २० ते २२ आणि ‘इंडिया’ला दोन ते ते तीन जागा; हरियाणात एनडीएला सहा ते आठ तर ‘इंडिया’ला दोन ते तीन जागा; पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला चार ते सहा जागा, काँग्रेसचा चार ते सहा जागा, भाजपला दोन ते तीन जागा आणि अकाली दलाला एक ते दोन जागा मिळू शकतात. या व्यतिरिक्त दिल्लीमध्ये भाजपला पाच ते सहा, ‘इंडिया’ला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. तर तेलंगणामध्ये बीआरएसला नऊ ते ११, एनडीएला दोन ते तीन, ‘इंडिया’ला तीन ते चार आणि अन्य पक्षाला एक जागा मिळू शकते. तमिळनाडूच्या ३९ जागांमध्ये ‘इंडिया’ला ३० ते ३४ आणि एनडीएला चार ते आठ जागा मिळू शकतात.

Exit mobile version