कर्नाटकमध्ये कोणाचा निकाल लागणार?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवार, १३ मे रोजी लागणार

कर्नाटकमध्ये कोणाचा निकाल लागणार?

कर्नाटकात १० मे रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल शनिवार, १३ मे रोजी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहेत. कर्नाटकातील २२४ जागांसाठी १० मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी ७२.६७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला. आता जनता सत्ता कोणाच्या हातात देणार याकडे लक्ष असणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २ हजार ६१५ उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये २ हजार ४३० पुरुष, १८४ महिला आणि एक तृतीयपंथीय उमेदवार रिंगणात आहेत. झालेल्या मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला अनुकूल चित्र दिसले होते. त्यात हे बहुतांश एक्झिट पोल काँग्रेस भाजपाच्या पुढे असेल असेच सांगण्यात आले होते. काँग्रेस आणि भाजपा यांच्यात प्रचंड चुरस असेल पण काँग्रेसला तिथे निसटती आघाडी मिळू शकते, असे आकडे एक्झिट पोलमध्ये समोर आले होते.

मात्र, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात प्रचंड सभा आणि रोड शो घेतले होते. या सभांना आणि रोड शोजला मिळालेला लोकांचा प्रतिसाद पाहता चित्र पालटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील प्रचारात सामील झाले होते. त्यांनाही जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे कर्नाटकात कोणाला सत्ता मिळणार याचे चित्र उद्या स्पष्ट होईल.

हे ही वाचा :

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचा छापा

“अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबद्दल कल्पना नसल्याचे अजित पवार खोटं बोलत आहेत”

३० हजार पगारी इंजिनीअरचा लाखोंचा थाट!

“नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ही चूक”

शनिवारी सकाळी ६ वाजता मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी हजर राहणार आहेत. ७.३० वाजता मतदान यंत्रे ठेवण्यात आलेली स्ट्रॉन्ग रूम उघडली जाईल. त्यानंतर प्रथम पोस्टाने आलेली मते मोजली जातील आणि नंतर मतदान यंत्रातील मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीच्या एकूण २२ फेऱ्या असून बेळगाव ग्रामीण मतदारसंघात २९ मतमोजणीच्या फेऱ्या असणार आहेत. मतमोजणी केंद्राच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

Exit mobile version