समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?

समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?

“समीर वानखेडे यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना या केसच्या तपासापासून दूर करून कोणाचा फायदा होऊ शकतो? हा खरा प्रश आहे.” असा आरोप समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केला आहे.

क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांची बहिण जास्मिन वानखेडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर समाजमाध्यम आणि फोनच्या माध्यमातून अनेक प्रकारचे आरोप आणि धमक्या दिल्या जात आहेत. त्यांनी सांगितलं की आम्हाला उघड-उघड अनेक धमक्या दिल्या जात आहेत. आमच्या कुटुंबातील महिलांवर आणि इतर सदस्यांवर अश्लील आरोप केले जात आहेत.

यापूर्वीच एका वेबसाइटने दिलेल्या एका खोडसाळ बातमी विषयी त्यांनी त्या वेबसाईटला सुनावले होते. वेबसाइटने त्यांच्या एका बातमीच्या शीर्षकात क्रांतीविषयी चुकीची माहिती दिली होती. क्रांतीवर आयपीएल मॅच फिक्सिंगचे आरोप असल्याचे शीर्षक त्यांनी दिले आहे. क्रांतीने ट्विट करत यावर आक्षेप घेतला आहे. फक्त काही व्ह्यूज मिळावे यासाठी तुम्ही दिशाभूल करणारे शीर्षक दिले, हे कशासाठी? असा सवाल तिने विचारला आहे.

हे ही वाचा:

‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे

पाकिस्तान जिंकल्याच्या जल्लोषात शिक्षिकेने गमावली नोकरी!

मुंबईकरांची लाईफ लाईन धावणार १०० टक्के क्षमतेने

आर्यन खानला आज जामीन मिळणार?

‘प्रत्येकजण पूर्ण बातमी वाचत नाही. तुमच्या निष्काळजी आणि असंवेदनशील लिखाणामुळे लोक मला ट्रोल करतात. आम्हालाही भावना आहेत, तुमच्या अशा चटपटीत बातम्या आम्ही खपवून घेणार नाही. जर मी दोषी असते, तर मी माझी चूक मान्य केली असती. पण मी दोषी नाही म्हणून मी हे सहन करणार नाही,’ असेही तिने एका ट्विटमध्ये लिहिले आहे.

परंतु आज त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांचे आभार मानले आहेत. माध्यमांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.

Exit mobile version