“हातात तलवार घेऊन शांततेत आंदोलन कोण करतं?”

चंदीगड उच्च न्यायालयाचा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खरमरीत सवाल

“हातात तलवार घेऊन शांततेत आंदोलन कोण करतं?”

देशात सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. पंजाब आणि हरियाणाच्या सीमाभागात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान या आंदोलनाबाबत चंदीगड येथील उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने शेतकऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. सुनावणी दरम्यान हरियाणा सरकारने उच्च न्यायालयाला आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनेक फोटो दाखवले होते. त्यानंतर न्यायालयाने शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांना देखील फटकराले आहे. हातात तलवार घेऊन शांततेत आंदोलन कोण करतं? असा सवाल न्यायालयाने विचारला आहे.

गुरुवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने पंजाब, हरियाणा सरकारसह शेतकऱ्यांनाही सुनावले. हे आंदोलन हाताळण्यास दोन्ही राज्याचे सरकार अपयशी ठरले आहेत. शेतकरी शुभकरण यांच्या मृत्यूची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.. सुनावणीवेळी हरियाणा सरकारने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे फोटो दाखवले तेव्हा न्यायाधीश संतप्त झाले होते. शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत होत असल्याचा दावा वारंवार केला जात असताना आंदोलन शांततापूर्ण असल्याचे सांगणाऱ्या वकिलांनाही न्यायालयाने फटकारले आहे.

आंदोलनाचे फोटो पाहून न्यायालयाने म्हटलं की, “ही खूप लाजिरवाणी बाब आहे, तुम्ही मुलांना पुढे करत आहात. मुलांच्या आडून आंदोलन करत आहात तेदेखील हातात शस्त्रे घेऊन. तुम्हाला इथं उभं राहण्याचाही अधिकार नाही. तुम्ही युद्ध करायला जात नाही. ही पंजाबची संस्कृती नाही. तुमच्या नेत्यांना अटक करून तुरुंगात पाठवायला हवे. तुम्ही निर्दोष लोकांना पुढे करताय हे लज्जास्पद आहे.” अशी टिपण्णी न्यायालयाने केली आहे.

हे ही वाचा :

रोहतकची जागा अभिनेता रणदीप हुड्डाला?

बेंगळुरूत पाण्याची भीषण टंचाई

उत्तर प्रदेशात सपाला आणखी एक धक्का बसणार!

रशियाच्या मिसाईलपासून झेलेन्स्की थोडक्यात बचावले

दरम्यान, शुभकरणच्या मृत्यूचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला आहे. पटियालाच्या खनौरी यथे शुभकरण सिंगचा मृत्यू झाला होता. शुभकरणचा मृत्यू एखाद्या शस्त्राने हाताला झालेल्या जखमेमुळे झाल्याचे समोर आले आहे गेल्या २० दिवसांपासून हरियाणा बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहे. हा मोर्चा दिल्लीच्या दिशेने जाणार आहे. अशातच आता न्यायालयाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

Exit mobile version