पुरावे नष्ट करण्यासाठी कोणी आदेश दिले?- आशिष शेलार

पुरावे नष्ट करण्यासाठी कोणी आदेश दिले?- आशिष शेलार

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसुख हिरेन हत्त्या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. ठाकरे सरकार मनसुख हिरेन हत्येचा तपास स्वतःकडेच ठेवण्याचा प्रयत्न का करत होतं? असा सवाल शेलारांनी केला आहे. मनसुख हिरेन यांचे शवविच्छेदन केले तेव्हा त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग का केले नाही? असा सवालही त्यांनी केला. हिरेन यांचा पोस्टमार्टमच्या अहवालात त्यांच्या तोंडात कोंबलेल्या रुमालाचा उल्लेखच नाहीये. हा उल्लेख का केला नाही? हे रुमाल कुणी पळवले आहे? तसेच याप्रकरणातील पुरावा नष्ट करण्यासाठी डायटोम टेस्ट करण्यात आली का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसुख हिरेन प्रकरणी अनेक सवाल उपस्थित केले. गेल्या काही दिवसात जे काही राज्यात सुरू आहे, त्याची उत्तरे राज्य सरकारला द्यावी लागतील. मनसुख हिरेन प्रकरण एनआयएकडे जाऊ नये असाच राज्य सरकारचा प्रयत्न होता. मात्र ठाणे कोर्टाने निर्णय दिल्यानंतर एनआयएकडे हा तपास देण्यात आला. एटीएसला हा तपास आपल्याकडेच ठेवायचा होता. त्यामागे पुरावे नष्ट करणे आणि चौकशीची दिशा भरकटवण्याचा त्यामागे कुहेतू होता का? असा सवाल शेलार यांनी केला.

हे ही वाचा:

२ एप्रिलला लॉकडाऊनचा निर्णय?

पटोले, दलवाईंनंतर सातवही राऊतांच्या विरोधात, काँग्रेस नेते सेनेवर नाराज?

संजय राऊतांचे युपीए २ चे इमले

संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का?- नाना पटोले

हिरेन यांचा मृतदेह मिळाला तेव्हा त्यांच्या तोंडावर रुमालाच्या पट्ट्या होत्या. माझ्याकडे शवविच्छेदन अहवाल आहे. फॉरेन्सिकला जाण्याआधीच्या रिपोर्टमध्ये या रुमालाच उल्लेख नाही. रुमाल हा या प्रकरणातील ठोस पुरावा आहे. त्याचाच उल्लेख अहवालात नाही. मग हे रुमाल कुणी पळवले? पोलिसांनीच जाणीवपूर्वक या रुमालांचा उल्लेख टाळला का? असा सवालही त्यांनी केला.

Exit mobile version