ये सचिन वाझे चीज क्या है?- किरीट सोमैय्या

ये सचिन वाझे चीज क्या है?- किरीट सोमैय्या

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैय्या यांनी सचिन वाझेंच्या सहा पेक्षा जास्त व्यवसायांवर आणि त्या व्यवसायांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांशी असलेल्या ‘पार्टनरशिप’ वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “ये सचिन वाझे चीज क्या है?” असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

शनिवारी रात्री उशीरा ११ वाजून ५० मिनिटांनी सचिन वाझे याला राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आली. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी ११ वाजता वाझे हे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या पेडर रोड येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. ही चौकशी तब्बल तेरा तास चालली. तेरा तासांच्या चौकशी नंतर वाझे याला एनआयए कडून अटक करण्यात आली. या अटकेनंतर भाजपा किरीट सोमैय्या यांनी सचिन वाझेंच्या शिवसेना नेत्यांशी भागीदारीत असलेल्या व्यवसायांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

हे ही वाचा:

सचिन वाझे यांना पंचवीस मार्च पर्यंत एनआयए कोठडी

सचिन वाझे कोर्टात हजर

सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?

वाझे प्रकरणातील ते शिवसेना नेते कोण?

काय म्हणाले किरीट सोमैय्या

“मुंबई पोलिसांमध्ये एपीआय असलेले सचिन वाझे यांचे सहा पेक्षा जास्त व्यवसाय आहेत. यामध्ये मल्टीबिल्ड इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड, टेक-लीगल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, डीजी नेक्स्ट मल्टिमिडीया लिमिटेड आणि इतर व्यवसाय आहेत. या व्यवसायांमध्ये कोणाशी ‘पार्टनरशिप’ केली आहे? तर शिवसेनेचे नेते संजय माशेलकर, विजय गवई हे मुलुंड आणि ठाण्यातले नेते आहे. ये सचिन वाझे चीज क्या है?” असे ट्विट किरीट सोमैय्या यांनी केले आहे.

Exit mobile version