कोण आहे नाईटलाईफचा तारणहार?

कोण आहे नाईटलाईफचा तारणहार?

मुंबईमध्ये नाईटलाईफ तुफान गर्दीत चालू असल्याचे दिसत आहे. मुंबईमधील अनेक बार आणि पबमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरा पर्यंत पार्ट्या सुरु असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी फेसबूक लाईव्ह मधून कोरोनाचे नियम पाळा असे सांगूनही नाईटलाईफवर याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून या मुद्द्यावर ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे. “नाईट लाईफचे तारणहार राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असताना मुंबईतल्या नाईट क्लबमधल्या तुफान गर्दीवर कारवाई करण्याची मुंबई महापालिकेची काय बिशाद? पर्यावरणाच्या रक्षणासाठी नाईट क्लबची नितांत गरज असावी.” असे ट्विट करत भातखळकरांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला आहे.

हे ही वाचा:

“आदित्य ठाकरेंच्या सांगण्याने पब आणि बार बिनधास्त सुरु”- देवेंद्र फडणवीस

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नाईट लाईफ आणि कोरोना निर्बंधांवरुन पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं. वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असून तिथे त्यांचेच चालते. आदित्य ठाकरेंनी सांगितल्याने पब आणि बार बिनधास्त सुरु असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोरोना हा फक्त शिवजयंती आणि अधिवेशनाच्या वेळी असतो नाईटलाईफला नसतो, असा टोला देखील त्यांनी लगावला.

Exit mobile version