आमदार आशीष शेलार यांनी उपस्थित केला सवाल
कॉर्डिलिया क्रूझ प्रकरण हे दिवसेंदिवस अधिक तापत चालले आहे. आता या प्रकरणातील सॅम डिसुझाने सुनील पाटील हे पात्र समोर आणल्यानंतर त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंध असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. त्यावर भाजपाचे आमदार ऍड. आशीष शेलार यांनी हल्लाबोल केला असून सुनील पाटील या व्यक्तीचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काय संबंध आहे? त्याची सीबीआय चौकशी व्हायला हवी. तशी चौकशी करण्यास राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार परवानगी देत नसेल तर सरकारचेच हात यात काळे आहेत, असे मानायला हरकत नाही, असेही शेलार यांनी म्हटले आहे.
सुनील पाटीलच्या सांगण्यावरून किरण गोसावी क्रूझ छापेमारी प्रकरणात काम करत होता, असे सॅम डिसुझाने सांगितल्यानंतर सुनील पाटील नेमका कोण, याचा तपास सुरू झाला. त्याचे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध असल्याचे बोलले जाऊ लागले. त्याबद्दल आशीष शेलार राष्ट्रवादी काँग्रेसला प्रश्न विचारतात की, सुनील पाटील तुमचा सदस्य आहे का? त्यावर तुमचं उत्तर काय? धुळ्याचे सुनील पाटील यांच्याशी राष्ट्रवादीचा थेट संबंध काय? आम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना संधी देत आहोत गुमानपणे कबुल करा. बऱ्याच गोष्टी आमच्या हाती लागल्या आहेत. त्यामुळे बाथरुमच्या आत शौचगृह असतं तिथूनही तोंड दाखवता येणार नाही. हा सुनील पाटील आर आर पाटील यांचं नाव बदनाम करत आहे. आज आबा हयात नाहीत. त्यांच्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही. सुनील पाटील आबांचे नाव घेत आहेत. यावरून राष्ट्रवादीची तळपायाची आग मस्तकात जात नाही का?
हे ही वाचा:
अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
सचिन वाझे १३ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच
दाऊदचा साथीदार चिंकू पठाण सोबत अनिल देशमुख काय करत होते?
राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी अहमदनगरच्या घटनेबद्दल व्यक्त केले दुःख!
शेलार म्हणाले की, आताचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचंही नाव घेतलं जातं आहे. त्यामुळे सुनील पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी परवानगी द्यावी आणि परवानगी दिली नाही तर सरकारचे हात यात काळे आहेत हे स्पष्ट होईल.