‘त्या’ स्कॉर्पिओ मालकाच्या कंपनीत संचालक असलेल्या शारदा एकनाथ शिंदे कोण?

‘त्या’ स्कॉर्पिओ मालकाच्या कंपनीत संचालक असलेल्या शारदा एकनाथ शिंदे कोण?

राज्यात सध्या दोन प्रकरणे चांगलीच गाजत आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनने भरलेल्या स्कॉर्पिओचे प्रकरण आणि त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण. या दोन्ही प्रकरणांचे सध्या तपास उरू असून रोज यात नवीन काहीतरी खुलासा होताना दिसत आहेत. अशातच आता सॅम पीटर न्यूटन हे नाव पुन्हा एकदा समोर येत आहे, तर त्यासोबतच शारदा एकनाथ शिंदे हे एक नवे नाव येत आहे.

अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ आढळून आली. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन नावाच्या ठाण्यातील एका व्यावसायिकाची असल्याची माहिती विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावर उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या गाडीचे मूळ मालक सॅम पीटर न्यूटन असल्याचे सांगितले. न्यूटनची गाडी हिरेन यांच्याकडे सर्विसिंगसाठी येत होती आणि पैसे थकवल्यामुळे हिरेन यांनी ती गाडी ठेवून घेतल्याचे देशमुख म्हणाले होते.

हे ही वाचा:

वाझे प्रकरणात शिवसेना एकाकी, मित्रपक्ष झाले आक्रमक

वाझे प्रकरणात इनोव्हा, दोन मर्सिडीज नंतर प्राडोची एन्ट्री

२४ तासांत महाराष्ट्राने नोंदवले आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण

सॅम न्यूटन हे मेलव्हीन्स एग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीत संचालक आहेत अशी माहिती समोर येत आहे. त्याच कंपनीत शारदा एकनाथ शिंदे या नावाच्या एक महिलाही संचालक असल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता या शारदा एकनाथ शिंदे नक्की कोण आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे. ट्विटरवर अभिषेक नावाच्या एका हॅण्डलवरून यासंबंधीचे ट्विट करण्यात आले आहे.

Exit mobile version