दिल्लीतील शेतकरी आंदोलना आडून हिंसाचार पसरवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलीस बीडमध्ये दाखल झाले आहेत. बीडच्या शंतनू मुळूक याच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याच शोधासाठी दिल्ली पोलीस बीडमध्ये दाखल झाले आहेत.
शंतनू मुळूक हा मूळचा बीडचा आहे. सध्या तो दिल्लीत राहत आहे. टूलकिट प्रकरणात त्याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून तो गायब आहे. त्यामुळेच त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस बीडमध्ये दाखल झाले असून शंतनू याच्याविषयची अधिक माहिती मिळवत आहेत.
हे ही वाचा:
पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू या तिघांनी टूलकिट दस्ताऐवज तयार केले होते. तसेच झूम ऍपवरून या तिघांनी मिटिंग करून अपप्रचार करण्याचे षडयंत्र रचले होते. असा दावा दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. टूलकिटमध्ये चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. आंदोलन फोफावण्यासाठी जानेवारीत टूलकिट तयार करण्यात आलं. हे आंदोलन विदेशापर्यंत पोहोचावं आणि परदेशातील भारताच्या दूतावासाला टार्गेट करता यावं म्हणून हा सगळा प्रकार करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यानंतर पाकिस्तान दिशा रविच्या बचावासाठी सरसावला
११ जानेवारी रोजी एक झूम मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये निकिता, शंतनू आणि दिशा रवी सहभागी झाले होते. या बैठकीला एमओ धालीवालही उपस्थित होते.२६ जानेवारीपूर्वीच ट्विटरवर धुमाकूळ घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पोलिसांच्या दाव्यानुसार या बैठकीला ६० ते ७० लोक उपस्थित होते.