अग्निशमन दलाचा ‘वाझे’ कोण?

अग्निशमन दलाचा ‘वाझे’ कोण?

मुंबई महापालिकेच्या अग्निसुरक्षा शुल्क आकारणीच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजपा आमनेसामने आले आहेत. बीएमसीमध्ये अग्निशमन विभागात पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचा ‘वाझे’ कोण? असा सवाल भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे.

भाजपकडून सत्ताधारी शिवसेना निशाण्यावर आली आहे. मुंबई महापालिका २०१४ नंतरच्या सर्व इमारतींकडून अग्निसुरक्षा शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे. १० ते १५ रुपये प्रति चौरस मीटर दराप्रमाणे पैसे घेतले जाणार आहेत. तर ताबा प्रमाणपत्र देताना विकासकाकडून हे शुल्क एकदाच घेतले जाणार आहे.

कोरोना संकटाचा हवाला देत मालमत्ता कर, पाणीपट्टीतील वाढ याला मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने विरोध केला होता. त्यामुळे करवाढीचा बोजा मुंबईकरांवर पडला नाही. एक दिलासा मिळाला असतानाच आता अग्निसुरक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.

दरम्यान, कोव्हिड संकट असल्याने कुठल्याही परिस्थितीत अग्निसुरक्षा शुल्क मुंबईकरांवर लादणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. तर पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता प्रशासनाने परिपत्रक काढल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली असून या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

हे ही वाचा:

कोविडला धोबीपछाड द्यायला मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय

रझा अकादमीचा जनाबसेनेला दम…मोहम्मद पैगंबर कायदा आणण्यासाठी दबाव

नवे मंत्री अश्विनी वैष्णव पहिल्याच दिवशी ऍक्शन मोडमध्ये

मोदींनी केला २०२४ चा शंखनाद

याआधी, मुंबई महापालिकेच्या डी विभागातील दोन कामगारांनी आपल्या बायकोच्या नावाने कंपनी स्थापन करुन कोरोना काळात पालिकेकडूनच कोट्यवधी रुपयांची कामं मिळवल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागात चतुर्थश्रेणी शिपाई असलेले अर्जुन नराळे आणि देखभाल विभागातील शिपाई पदावर असलेले रत्नेश भोसले यांनी आपापल्या पत्नींच्या नावे कंपनी सुरु केल्याचा आरोप आहे. या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

Exit mobile version