प्रणिती शिंदे रोहित पवारांना ओळखेनाशा झाल्या

प्रणिती शिंदे यांची आगपाखड करत प्रतिप्रश्न

प्रणिती शिंदे रोहित पवारांना ओळखेनाशा झाल्या

सोलापूर लोकसभा मतदार संघ हा सध्या एक मोठा चर्चेचा विषय आहे. त्याला कारण सुद्धा तसेच आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये सध्या चढाओढ सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनी राष्ट्रवादीकडून सोलापूर मतदारसंघावर दावा करत माविआ च्या बैठकीत निर्णय होईल असे म्हंटले होते आणि हाच मतदार संघ रोहित पवार आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये जुंपल्याचे कारण बघायला मिळत आहे.आता यावरूनच प्रणिती शिंदे यांनी त्यांना थेटच सुनावले आहे.

रोहित पवार आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे वाद चालू असतानाच काँग्रेस नेत्यांनी पवार यांच्यावर टीका करत आम्ही सुद्धा बारामती लोकसभा मतदार संघ मागून घेऊ असे म्हण्टले आहे. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध चालू असतानाच आज प्रणिती शिंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

प्रणिती शिंदे काय म्हणाल्या

आज सोलापूर मध्ये माध्यमांशी बोलताना रोहित पवार कोण ?असा प्रश्न करत त्यांनी थेट रोहित पवार यांना सुनावले आहे. ते अजून मॅच्युअर नसून त्यांची आमदारकीची पहिलीच टर्म आहे. त्यामुळे ते असा पोरकटपणा करत आहेत. अशी टीकाही त्यांनी केली आहे.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?

काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा

सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार

इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले

रोहित पवार काय म्हणाले ?   

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीवरून व्यक्तिगत राजकारण सुरु आहे. सिद्धेश्वर साखर कारखाना बंद झाला तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल त्यामुळे येथील आमदार आणि खासदार बदलले पाहिजे, असे रोहित पवार सोलापूर दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले होते. त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार शेतकरी मेळाव्याला आले असताना सोलापूरला काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादीचा खासदार होउदे, अशी मागणी आपण पक्ष श्रेष्टींकडे करू असेही पवार म्हणाले.

Exit mobile version