अविघ्न पार्क आगीवरून पेटला वाद! नेमके दोषी कोण?

अविघ्न पार्क आगीवरून पेटला वाद! नेमके दोषी कोण?

मुंबई मधील करी रोड भागात भीषण आग लागली आहे. करी रोड येथील अविघ्न पार्क या इमारतीमध्ये हा अग्नितांडव सुरु आहे. अविघ्न पार्क या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्रथम दर्शनी पुढे येत आहे. या आगीमुळे या इमारतीच्या आसपासच्या परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.

शुक्रवार, २२ ऑक्टोबर रोजी दुपारचा सुमारास करी रोड मधून ही आगीची घटना पुढे आली. ही आग विझवण्यासाठी एकीकडे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु असतानाच ही आग लागण्यामागे नेमका दोष कोणाचा यावरून नवा वाद पेटलेला दिसून आला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही आग लागण्यामागे अविघ्न इमारतीतील अपुऱ्या सुविधांना दोष दिला आहे.

या इमारतीत असलेली वॉटर सिस्टीम वर्कींगमध्ये नव्हती असा दावा महापौरांनी केला आहे. तर प्रत्येकवेळी महापालिकेला दोष देऊन कसा चालेल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. इमारतीत सगळ्या सिस्टीम आहेत पण त्या वर्किंगमध्ये ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे या प्रकरणात प्रथम दर्शनी तरी सोसायटीचे जे काही मॅनेजमेंट आहे तेच दोषी असल्याचे दिसत आहे असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा:

पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले

१०० कोटी लसीकरण हे नव्या भारताचे चित्र

करी रोडमधील अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी भेट

तर रहिवाश्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून या इमारतीचे हक्क बिल्डरने सोसायटीच्या नावे केलेले नाहीत. त्या सोबतच बिल्डर अनधिकृत बांधकाम करत असल्याचा आरोप अविघ्न पार्क इमारतीतील रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमका दोष कोणाचा या वरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. तर या प्रकरणी आता कारवाई कोणावर होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version