कोण आहे टूलकिट प्रकरणातील पीटर फ्रेड्रिक?

कोण आहे टूलकिट प्रकरणातील पीटर फ्रेड्रिक?

‘टूलकिट’ प्रकरणात अनेक नावे समोर येत आहेत. यातील एक अपरिचीत नाव समोर आले आहे, ते म्हणजे पीटर फ्रेड्रिक. पीटर फ्रेड्रिक हे नाव भारतात तेवढे परिचीत नसले तरी भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर २००६ पासूनच हे नाव आहे. दिल्ली पोलिसांच्या अनुसार पीटर फ्रेड्रिक हा खलिस्तानी संघटनांशी निगडीत आहे.

टूलकिट हे अत्यंत काळजीपूर्वक बनवलेले डॉक्युमेंट आहे. ठराविक दिवशी ट्रेंड करण्यासाठी काय हॅशटॅग बनवायचे, कोणती कारवाई करावी लागेल, कोणाला टॅग करावे लागेल आणि कोणाचे अनुसरण करावे लागेल. टूलकिटमधील या भागावर लक्ष केंद्रित केल्यावर आम्हाला नामांकित मीडिया हाऊसेसची नावे आणि एक अपरिचीत नाव आढळले. ते म्हणजे पीटर फ्रेड्रिकचे.

हे ही वाचा:

कोण आहे टूलकिट प्रकरणातील शंतनू मुळूक?

फ्रेड्रिकचे खालिस्तानी समर्थक भजनसिंग भिंडर उर्फ इक्बाल चौधरी याच्याशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. भिंडरचा संदर्भ देत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, “तुमच्यातील बहुतेकांना हे नाव परिचीत असेल. कमीतकमी जे आयएसआयच्या के२ (काश्मीर ते खलिस्तान) डेस्कवर लक्ष देतात.

“२००६ मध्ये भजन सिंग भिंडर उर्फ इक्बाल चौधरी यांच्याशी संपर्कात आल्याचे कळल्यापासूनच पीटर फ्रेड्रिक यांचे नाव दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहे.” असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

पीटर फ्रेड्रिकने विदेशातील अनेक दूतावासांसमोर भारत सरकार विरोधात खलिस्तानी संघटनांबरोबर प्रदर्शने केली. यामध्ये सीएए- एनआरसीचा विरोध, कलम ३७० काढल्याचा विरोध आणि शेतकरी आंदोलन या सर्व मुद्द्यांविरोधात पीटरने प्रदर्शन केले होते.

Exit mobile version