26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणकोण आहेत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे?

कोण आहेत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे?

Google News Follow

Related

मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली झाल्यानंतर मुंबई शहराचे आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेमंत नगराळे हे १९८७ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेले नगराळे यांचं ६ वी पर्यंतचे शिक्षण चंद्रपूरच्या भद्रावती येथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहेत. त्यानंतर त्यांनी नागपूरच्या पटवर्धन हायस्कुलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर व्हीएनआयटीमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरींग शाखेतून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी जेबीआयएमएसमधून मास्टर्स ऑफ फायनान्स मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

हे ही वाचा:

अखेर परमबीर सिंह यांची हकालपट्टी

परमबीर सिंह यांचे तात्काळ निलंबन करून त्यांना अटक करा – अतुल भातखळकर

ममतांचे दुखापतीनंतरचे अजब विधान, हिंदू देवतांबद्दल काय बोलल्या?…

अखेर परमबीर सिंह यांची हकालपट्टी

त्यांना त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रपतींचे पोलिस पदक, विशेष सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदक प्राप्त झाल आहे.

हेमंत नगराळे यांचा कार्यकाळ

नगराळे हे पहिल्यांदा १९८९-९२ मध्ये चंद्रपूरच्या नक्षलवादी भागात एएसपी म्हणून नियुक्त झाले होते.

त्यानंतर सोलापूरमध्ये डीसीपी असताना १९९२-९४ या काळात त्यांनी सोलापूरला स्वतंत्र आयुक्तालय स्थापन केले. त्याबरोबरच बाबरी मस्जिदी नंतर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती देखील त्यांनी कौशल्याने हाताळली होती.

त्यानंतर ते रत्नागिरी जिल्ह्याचे एसपी (१९९४-१९९६) होते. त्यावेळी त्यांनी दाभोळच्या एन्रोन प्रकरल्पातील भूसंपादनामुळे निर्माण झालेले प्रश्न हाताळले होते.

सीआयडी-एसपी असताना १९९६-९८ याकाळात त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीच्या प्रकरणाचा तपास केला. या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्राच्या विविध भागापर्यंत पोहोचले होते. त्याबरोबरच अनेक मुलांचे अपहराण करण्यात आलेली ‘अंजनाबाई गावित खटला’ त्यांनी हाताळला होता. या खटल्याचा अंत गुन्हेगारांना सर्वोच्च न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा देण्यात झाला होता.

हेमंत नगराळे यांनी मार्च १९९८- सप्टेंबर २००२ या काळात अनेक उच्च पदे भुषवली आहेत. याकाळात ते मुंबईचे एसपी, बीएसएफसी, सीबीय म्हणून कामकाज पाहात होते, तर नंतर डीआयजी, सीबीआय या पदावर ते नवी दिल्ली होते. या काळात त्यांनी केतन पारेख यांचा ₹१३० कोटींचा घोटाळा, माधोपुरा को- ऑप बँक ₹१,८०० कोटींचा घोटाळा आणि २००१ मधील ₹४०० कोटींचा हर्षद मेहताचा घोटाळा या खटल्यांचा तपास केला होता.

तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास करणारे डीजीपी, एसआयटी श्री. एस. एस. पुरी यांच्या चमूतील अधिकारी म्हणून नगराळे यांनी केलेल्या कामाचे खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने कौतुक केले आहे.

अतिरीक्त सीपी, पूर्व भाग इथे जून २००७-०८ या काळात त्यांनी पुन्हा एकदा संवेदनशील भागातील त्यांच्या कौशल्याचा परिचय करून दिला होता.

त्यांना एमएसईडीसीएलचे आयजीपी आणि डायरेक्टर म्हणून जून २००८- ऑगस्ट २०१० या काळासाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या कार्यकाळात कंपनीच्या उत्पन्नात २५ टक्क्यांची वाढ झाली होती. शिवाय उर्जेची चोरी देखील मोठ्या प्रमाणात कमी झाली होती.

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दुःखद हल्ल्याच्या काळात त्यांनी अतिशय धाडसाचे काम करून दाखवले होते. हेमंत नगराळे हे एमएसइडीसीएलचे अधिकारी असूनही त्यांनी काही जखमी आणि मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना सुरक्षित जागी पोहोचवण्यास मदत केली होती. शिवाय त्यांना स्वतःला आरडीएक्स आढळल्यानंतर त्यांनी ते सुरक्षित स्थळी हलविले होते. ते स्वतः चार पोलिस कर्मचाऱ्यांसोबत हल्ला चालू असलेल्या ताज हॉटेलमध्ये शिरले होते. तिथे त्यांनी जबरदस्त कामगिरी बजावत अनेक जखमी लोकांना हॉटेलबाहेर काढले. ताजच्या शॉपिंग प्लाझामध्ये अडकलेल्या अनेकांना त्यांनी वाचवले.

पोलिस महासंचालक कार्यालयात विशेष आयजीपी असताना त्यांनी एमपीकेएवाय योजनेतील त्रुटी दुर करून या योजनेवरील ₹१० कोटींचा खर्च कमी करून दाखवला होता. जॉईंट कमिशनर असताना त्यांनी मुंबई पोलिसांना दिल्या जाणाऱ्या क्वार्टरमध्ये पारदर्शकता आणली होती.

नगराळे काही काळ २०१४ मध्ये मुंबई पोलिस आयुक्त होते. त्याकाळातील रास्ता रोको त्यांनी ज्या तऱ्हेने हाताळले होते, त्याचे कौतूक खुद्द गृह मंत्रालयाने केले होते.

त्यांनी नवी मुंबई येथे देखील कर्तबगारी बजावली होती. त्यांना ऑक्टोबर २०१८ मध्ये पोलिस महासंचालक म्हणून पदभार देण्यात आला होता.

आता हेमंत नगराळे मुंबईचे नवे आयुक्त झाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा