बांगलादेशातील अंतरिम सरकारचे नेतृत्व करणारे मोहम्मद युनूस कोण आहेत?

राष्ट्रपती भवनात झालेल्या बैठकीत मोहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी निवड

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे नेतृत्व करणारे मोहम्मद युनूस कोण आहेत?

भारताचा शेजारी देश आलेल्या बांगलादेशमध्ये मोठा राजकीय फेरबदल झाला असून तिथे आता अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. या अंतरिम सरकारची सूत्र नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्याकडे असणार आहेत. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बांगलादेशमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोहम्मद युनूस यांचा अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांसह तिन्ही सेना प्रमुखांनीही या बैठकीला हजेरी लावली होती.

गरिबीशी लढा देण्यासाठी ‘बँकर ऑफ द पुअर’ म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद युनूस हे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून आंदोलक विद्यार्थ्यांची पहिली पसंती होते. राष्ट्रपती भवनात झालेल्या बैठकीत मोहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव बांगलादेशमधील आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला होता. त्यांचा हा प्रस्ताव या बैठकीत मान्य करण्यात आला. त्यानुसार आता मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन होणार आहे.

मोहम्मद युनूस हे शेख हसीना यांचे कट्टर विरोधक मानले जातात. पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. “आम्ही शेख हसीना यांच्या कारकिर्दीत त्यांच्या अंमलाखालचा देश होतो. त्या एखाद्या अंमलदाराप्रमाणे वागत होत्या. एखाद्या हुकुमशाहप्रमाणे सगळंकाही नियंत्रित करत होत्या. आज बांगलादेशचे सर्व नागरिक स्वतंत्र झाले आहेत”, असं युनूस म्हणाले होते.

हे ही वाचा:

विनेशने घडवला इतिहास; पहिली सुवर्ण किंवा रौप्य जिंकणारी महिला कुस्तीगीर ठरणार

बांगलादेशनंतर ब्रिटनमध्ये हिंसाचार; प्रवाशांसाठी सूचना जारी

नीरज चोप्रा ‘नंबर वन’

परकीय हाताच्या शोधात, एक हसिना, एक दिवाना…

कोण आहेत मोहम्मद युनूस?

मोहम्मद युनूस यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. ‘बँकर ऑफ द पुअर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युनूस आणि त्यांनी स्थापन केलेल्या ग्रामीण बँकेला २००६ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. ग्रामीण भागातील गरीबांना १०० डॉलरपेक्षा कमी कर्ज देऊन लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यास मदत केली. या गरीब लोकांना बड्या बँकांकडून कोणतीही मदत मिळू शकली नाही.

Exit mobile version