‘पालिकेतील वजनदार नेत्याच्या आशीर्वादाशिवाय हा भ्रष्टाचार अशक्यच’

‘पालिकेतील वजनदार नेत्याच्या आशीर्वादाशिवाय हा भ्रष्टाचार अशक्यच’

चतुर्थ कर्मचाऱ्यांनी घेतली पत्नीच्या नावे कंत्राटे

मुंबई महानगरपालिकेच्या चतुर्थश्रेणी कामगारांची हेराफेरी. पत्नीच्या नावे कंपनी उघडून पालिकेकडून कोट्यवधींची कंत्राटं मिळवण्यात आली आहेत. खाण तशी माती. महापालिकेतील एखाद्या वजनदार सत्ताधारी नेत्याच्या आशीर्वादाशिवाय हा भ्रष्टाचार शक्यच नाही, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी पालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने केलेल्या घोटाळ्यावर सडकून टीका केली आहे.

मुंबई महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी अर्जुन नराळे आणि रत्नेश भोसले यांनी हा घोटाळा केला आहे. त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे कंपनी स्थापन करून कोरोना काळात पालिकेकडून कोट्यवधीची कंत्राटे मिळविली असल्याचे उघड झाले आहे.

नराळेची पत्नी अपर्णाच्या नावे असलेल्या श्री एंटरप्रायझेस आणि कंपनीने दीड वर्षांत एक कोटी ११ लाख रुपयांची कंत्राटे मिळविली. तर रत्नेश भोसलेने पत्नी रिया भोसलेच्या नावाने आर.आर. एंटरप्रायझेस आणि कंपनीला ६५ लाखांची कामे मिळाली. हे दोन्ही कर्मचारी शिपाई पदावर कार्यरत आहेत.

हे ही वाचा:

नव्या रेल्वे मंत्र्यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय

बाजार समित्यांना मोदी सरकारकडून एक लाख कोटी मिळणार

मोदींनी केला २०२४ चा शंखनाद

रझा अकादमीचा जनाबसेनेला दम…मोहम्मद पैगंबर कायदा आणण्यासाठी दबाव

शिपाई पदावर असलेले अधिकारी वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय हे कृत्य करू शकत नाहीत, याची चर्चा आता सर्वसामान्य करू लागले आहेत.

खरे तर पालिकेच्या अधिनियमानुसार पालिकेत काम करणारी व्यक्ती आपल्या नातेवाईकांच्या नावे कंत्राटे घेऊ शकत नाही. परंतु, असे असतानाही या कर्मचाऱ्यांनी ही कंत्राटे उचलली आहेत. त्यामुळे यात आणखी कुणाचे हात अडकले आहेत, याचा शोध आता घेतला जात आहे.

पालिकेतील डी विभागाला आवश्यक असलेल्या वस्तुंचा पुरवठा या कंपन्यांनी केला आहे. गाड्या, टेबल, कॉम्प्युटरचे सुटे भाग, स्क्रू, ड्रायव्हर, कोव्हिट सेंटरसाठी ऑक्सिमीटर, स्टीमर अशा विविध वस्तुंचा पुरवठा या कंपन्यांमार्फत केला गेला.

Exit mobile version