संपवून टाकू, निपटून टाकू हे बोलण्याची हिंमत जरांगेंमध्ये आली कुठून?

आशिष शेलरांनी विचारला सवाल

संपवून टाकू, निपटून टाकू हे बोलण्याची हिंमत जरांगेंमध्ये आली कुठून?

मराठा आंदोलनाचा मुद्दा मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी विधानसभेत पेटून उठला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. मनोज जरांगे यांच्या मागे कोण आहे? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. आशिष शेलार यांनी अंतरवली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनीही याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

आशिष शेलार म्हणाले की, “संपवून टाकू, निपटून टाकू, बोलण्याची हिंमत मनोज जरांगेंमध्ये कशी आली? आधी भुजबळ, मग उपमुख्यमंत्री आता मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्या जरांगे यांच्या मागे कोण आहे? ते समोर येण्यासाठी एसआयटी चौकशी व्हाही,” अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

हे ही वाचा:

तिसऱ्या पेन ड्राईव्हची प्रतिक्षा…

आरएसएस, मोदीविरोधाची गरळ ओकणाऱ्या निताशा कौलला भारताबाहेर हाकलले

ज्येष्ठ गायक पंकज उधास काळाच्या पडद्याआड

‘सुशांतसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचारात होतो’

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा उधळून लावू म्हणतात. ही भाषा वापरणारे तुम्ही आहात कोण? कटकारस्थानाची योजना बनली कशी? मराठा समाजाची मोनोपॉली एका व्यक्तीला दिली का? जरांगे कुठं राहतात? तो कारखाना कुणाचा? दगड कुठून आले? हे समोर यावं,” अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. मनोज जरांगे यांच्या सुरुवातीपासून एक, एक मागण्या मान्य केल्या. त्या मान्य केल्या. परंतु, आता जरांगे यांची भाषा बदलली. ते महाराष्ट्र बेचिराख करण्याबाबत बोलू लागले. आपण हा डाव उधळल्याचे त्यांनी म्हटले. मग महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना कोणाची होती? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version