27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरराजकारणआपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी संजय आणि सुनील राऊत यांची 'सामना'त जाहिरात

आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी संजय आणि सुनील राऊत यांची ‘सामना’त जाहिरात

राऊत बंधूंचे समर्थन

Google News Follow

Related

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त  शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामना  वृत्तपत्रांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या (२३ जानेवारी) जयंती आहे. या जाहिरातीत संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी फक्त स्वतःची नावे छापून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आलं आहे. “साहेब मी गद्दार नाही, गेलेल्या ४० गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभं राहू तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केलं याचं समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकांना होईल.जय हिंद,जय महाराष्ट्र!”,असा मजकूर या जाहिरातीत छापला आहे. आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी राऊत बंधूंना जाहिरात का प्रसिद्ध करावी लागली असा सवाल लोक उपस्थित करत आहेत. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता ठाण्यातील एका कार्यक्रमात दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केसरकर यांची प्रतिक्रिया

जे झोपतात तेच फक्त स्वप्न पाहतात. म्हणून आजकाल बरेच लोक स्वप्न पाहतात. आम्ही काम करणारे लोक आहोत, आम्ही काम करत राहतो, असा चिमटा केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना काढला. शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे यांना त्यांचा मान मिळेल असं वाटलं होतं. पण त्यांचा अपमान करण्यात आला. तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे का? अशी विचारणा करण्यात आली. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात अश्रू आले,असं सांगतानाच मुख्यमंत्रीपदासाठी कुणी काय केलं? याचा दोन दिवसात खुलासा करणार आहे,असा इशाराच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. केसरकर यांनी थेट उद्धव ठाकरे यांना नाव न घेता इशारा दिला आहे. त्यामुळे केसरकर आता काय नवा गौप्यस्फोट करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. तसेच यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. कलम ३७० काढणे हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते.भाजपने हे स्वप्न पूर्ण केलं. पण हे कलम रद्द करण्यास काँग्रेसने विरोध केला. ३७० कलमाला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या लोकांना शिवसेनेच्या नेत्यांनी भेटणे हा बाळासाहेब ठाकरेंचा मोठा अपमान आहे, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक

 

बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही

शिवसेनेत आम्ही बंड केलं. त्यानंतर आम्ही कुठेही जायचो तेव्हा गोमूत्र टाकून ती जागा स्वच्छता केली जायची. आता त्याचप्रमाणे संजय राऊत यांच्यावर गोमूत्र टाकून स्वच्छता करावी, असा टोला लगावतानाच जे सत्तेसाठी काँग्रेसच्या पायाला हात लावतात, जे सत्तेसाठी राष्ट्रवादीच्या मागे धावतात, त्यांना बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल केसरकर यांनी चढवला.

बरेच लोक स्वप्न पाहतात
काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जे झोपतात ते फक्त स्वप्न पाहतात. म्हणूनच आजकाल बरेच लोक स्वप्न पाहतात. आम्ही काम करणारे लोक आहोत, आम्ही काम करत राहतो, असा चिमटा त्यांनी काढला.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा