24.8 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरराजकारणभिडेंना गुरुजी म्हटल्याने कुणाला काय अडचण?

भिडेंना गुरुजी म्हटल्याने कुणाला काय अडचण?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले

Google News Follow

Related

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याबद्दलचे पडसाद आजही विधानसभेच्या दोन्ही सभागृहात उमटले. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर कारवाईची मागणी आजही विरोधकांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर बोलताना भिडे गुरुजी असा उल्लेख केल्यानंतर विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला. त्याबाबत मग फडणवीस यांनी सडेतोड जवाब दिला. ते म्हणाले की, भिडे हे आम्हाला गुरुजी वाटतात, तुम्हाला काही अडचण आहे का?  भिडे गुरुजी यांना नोटीस देण्यात आली आहे. अमरावतीच्या राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. ज्या प्रमाणे भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे, त्याच प्रमाणे स्वा. सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्रावर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

 

गृहमंत्री फडणवीस म्हणाले, भिडे गुरुजी यांनी अमरावतीमध्ये आपल्या सहकार्याला पुस्तक वाचायला लावले. त्यातील आशयावरून काही विधाने केली आहेत. त्यातील डॉ. एस. के. नारायणचार्य आणि घोष यांची ती पुस्तके आहेत. ते काँग्रेसचे नेते आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. त्यातील मजकूर त्यांनी त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून उदघृत केला. एका पुस्तकाचे नाव ‘द कुराण अँड द काफिर हे ए. घोष यांचे पुस्तक आहे. त्यातील काही मजकुराचे वाचन केल्याचे समाजमाध्यमात फिरत असलेल्या व्हिडिओतून दिसते. राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीमधील भाषणाचे व्हिडीओ उपलब्ध नाही. त्यांच्या आवाजाचे नमुने घेतले जातील, असे पोलिसांचे मत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हे ही वाचा:

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९४ लाख अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली होती ऑफर

भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत १५ पदांसाठी दुप्पट अर्ज

गलवानमध्ये वडील गमावले; पण १४ वर्षीय प्रसन्नाला हॉकीने सावरले!

 

गृहमंत्री फडणवीस म्हणाले, कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कोणीही अवमानजनक वक्तव्य केले तर त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल. संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वाकरता काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी त्यांच्या किल्यांशी बहुजन समाजाला जोडतात. त्यांच्या वक्तव्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे वीर सावरकरांवर देखील आक्षेपार्ह लिखाण करण्यात येते. काँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’ मध्ये स्वा. सावरकर माफीवीर होते. ते स्वातंत्र्य लढ्यात नव्हते, असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे ‘शिदोरी’वर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल.

भाई जगताप, पृथ्वीराज बाबा म्हटले तर का चालते?

गृहमंत्री फडणवीस बोलताना संभाजी भिडे गुरुजी असा उल्लेख करत होते. त्यातील गुरुजी या शब्दावर विरोधकांनी आक्षेप घेतला, तेव्हा फडणवीस यांनी काय अडचण आहे? असा सवाल केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा आक्षेप घेतला तेव्हा फडणवीस म्हणाले तुमचे नाव पृथ्वीराजबाबा असे आहे तर आम्ही बाबा या नावाबद्दल पुरावा मागायचा का? असा त्यांनी सवाल करताच सभागृहात हशा पिकला.

विधानपरिषद सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या निवेदना दरम्यान भिडे यांचा संभाजी भिडे गुरुजी असा आदरार्थी उल्लेख केला. यावर काँग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी आक्षेप घेतला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, जसे तुम्हाला सर्वजण ‘भाई’ म्हणतात तसेच संभाजी भिडे यांना देखील ‘गुरुजी’ नावानेच ओळखले जाते. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख आपण गुरुजी असा करत असल्याचे स्पष्टीकरण दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा