कोणाला मिळालं ‘हेलीकॉप्टर’ आणि कोणाला ‘शिलाई मशीन’?

कोणाला मिळालं ‘हेलीकॉप्टर’ आणि कोणाला ‘शिलाई मशीन’?

चिराग पासवान आणि त्यांचे काका पशुपती पारस यांनी वेगळे पक्ष बनवल्यानंतर काही महिन्यांनंतर नवीन पक्षाची नावे आणि चिन्हे मिळाली आहेत. त्यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्याच्या काही दिवसांनंतर निवडणूक आयोगाने आज हे पाऊल उचलले आहे.

बिहारमध्ये ३० ऑक्टोबर रोजी कुशेश्वर अस्थान आणि तारापूर या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या आधी माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी २००० साली स्थापन केलेल्या एलजेपीच्या विरोधात निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंच्या प्रतिदाव्यांना प्रतिसाद दिला होता. चिराग पासवान यांना त्यांनी विनंती केलेल्या पक्षाचे नाव मिळाले, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) आणि निवडणूक चिन्ह म्हणून ‘हेलिकॉप्टर मिळाले आहे. दरम्यान पशुपती पारस यांच्या पक्षाला नाव देण्यात आले आहे, राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी आणि त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘शिवणकाम’ मशीन हे आहे. असे निवडणूक आयोगाने निवेदनात म्हटले आहे.

दोन्ही नेत्यांना सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत पोटनिवडणुकीसाठी स्वतंत्र नावे आणि चिन्हे देण्यास सांगण्यात आले. “मी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करतो. मला राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी आणि ‘शिलाई मशीन’ चिन्ह देण्यात आले आहे.” असं पशुपती पारस म्हणाले.

हे ही वाचा:

मुंबई नाशिक प्रवास करता येणार अवघ्या दोन तासांत

शाळेत जाणाऱ्या शिक्षकांनाच झाली शिक्षा!

ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!

मुंबई पालिका म्हणतेय, छट्, तिसरी लाट वगैरे काही येणार नाही!

ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांचाचा मोठा भाऊ रामविलास पासवान यांच्या मृत्यूच्या काही महिन्यांनंतर, पहिल्यांदा खासदार आणि सहा वेळा आमदार असलेल्या पशुपती पारस यांनी जूनमध्ये त्यांच्या पुतण्याविरोधात बाजी पलटवली. दोन्ही नेत्यांमधील मतभेद शिगेला पोहोचल्यामुळे दोन गट तयार झाले आहेत.

Exit mobile version