राहुल गांधी यांनी अफू घेऊन लिखाण केलेय का?

भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांचा संतप्त सवाल

राहुल गांधी यांनी अफू घेऊन लिखाण केलेय का?

भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथील त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत त्यांचा चांगलाच समाचार घेतला. राहुल गांधी यांचा एक लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला आहे. या लेखावर उदयनराजे भोसले यांनी आक्षेप घेत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. उदयनराजे म्हणाले की, भ्रमिष्ट राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित केला आहे. हा मजकूर वाचून माझ्या मनाला वेदना होत आहेत.

उदयनराजे भोसले यांनी लेख प्रकाशित होताच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. खासदार उदयनराजे म्हणाले, राहुल गांधी यांनी अफू घेऊन असे गलिच्छ लिखाण केले असावे. त्यांना या देशात राहण्याचा अधिकार राहिलेला नाही. अशी माणसे आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा तसेच या लोकांना वेचून ठेचले पाहिजे, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना लोक दैवत मानतात. त्याकाळी त्यांनी पुरोगामी सर्वधर्म समभावातून स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्यात लोकांना सहभागी करुन लोकशाहीचा पाय महाराजांनी भरला. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणारे हे स्वतःला कोण समजत आहेत? युगपुरुषांविषयी आदरपूर्वकच बोलले पाहिजे. मात्र, त्यांच्याकडून अपमान झालेला आहे. त्यांना इतिहासाची किती माहिती आहे, शिवाजी महाराजांविषयी माहिती आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरेंनी काढला फतवा, तमाम हिंदू बांधवांनो-भगिनींनो पाठीशी उभे राहा!

अमेरिकेत चाय-बिस्कुटांसह सोरोस तंत्राचाही पराभव…

संविधानाचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता माफ करणार नाही!

५० लाख रुपये दे नाहीतर… शाहरुख खानला धमकी!

राहुल गांधींसारखी व्यक्ती कोणत्या पक्षाचे नेतृत्व करू शकतो का? त्यांना चुकूनही संधी मिळणार नाही पण मिळाली तर देशाचे काय होईल? राहुल गांधी यांनी आपल्या लिखाणातून युगपुरुषांना अप्रत्यक्ष शिव्या दिल्या आहेत. अशा व्यक्तीशी बोलणे ही मी कमीमपणा समजतो. या विरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज ही देशातील सर्वांचीच अस्मिता आहे, अशा भावना उदयन राजेंनी व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version